कडेकोट पोलिस बंदोबस्तात भिडे गुरुजी नगर येथे दाखल

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Jun-2018
Total Views |

 
 
अहमदनगर : अनेक कारणांमुळे चर्चे असलेले संभाजी भिडे गुरुजी आज नगर येथे दाखल झाले आहे. आज त्यांची पटेल मंगल कार्यालय येथे सभा आयोजित करण्यात आली आहे. यानिमित्ताने नगर येथे झाल्या कारणाने त्यांना कडेकोट पोलिस बंदोबस्त देण्यात आला आहे.
 
श्री शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी आज सकाळी कार्यक्रमस्थळी दाखल झाले आहेत. या सभेला काही संघटनांनी विरोध केल्याच्या पार्श्वभूमीवर कार्यक्रमस्थळी कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
 
संभाजी भिडे गुरुजी यांची ‘संकल्प सुवर्ण सिंहासनाचा जागर हिंदुत्वाचा’ या उपक्रमांतर्गत नगरमधील पटेल मंगल कार्यालयात आज सभा होणार आहे. या सभेला आरपीआय आणि इतर संघटनांचा विरोध आहे. तसेच या संघटनांनी भिडेंच्या सभेवर ‘एल्गार मोर्चा' नेण्यााचा इशारा दिला आहे. त्यामुळे शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी सभेच्या ठिकाणी पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे.
 
या बंदोबस्तामध्ये ४ पोलीस उपअधिक्षक, ७ पोलीस निरीक्षक, १६ सहाय्यक पोलीस निरीक्षक, २०० पोलीस कर्मचारी, २ एसआरपीच्या तुकड्या आणि ६ आरसीपीच्या तुकड्यांचा समावेश आहे.
@@AUTHORINFO_V1@@