भारत पाकिस्तान सीमेवर भारतीय सैन्याची मोठी कामगिरी, ५ दहशतवाद्यांना कंठस्थान

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Jun-2018
Total Views |

 
 
कुपवाडा (जम्मू काश्मीर) :  गेल्या काही दिवसांपासून जम्मू काश्मीर येथे सुरु असलेल्या दहशतवादी कारवाया काही थांबण्याचे नाव घेत नाहीयेत, मात्र भारतीय लष्कराने या दहशतवादी कारवायांना नेहमीच चोख प्रत्यूत्तर देत दहशतवाद्यांना कंठस्थान घातले आहे. आज जम्मू काश्मीर येथील कुपवाडा येथे सीमेडजवळील क्षेत्रात दहशतवाद्यांनी घुसखोरीचा प्रयत्न केला. मात्र हा प्रयत्न भारतीय सैन्याने उधळून लावला. व यावेळी चकमकीत ५ दहशतवाद्यांना कंठस्थान घालण्यात भारतीय सैन्याला यश मिळाले आहे.
 
कुपवाडा येथील केरन सेक्टरमध्ये घुसखोरीचा प्रयत्न करणाऱ्या पाच दहशतवाद्यांना सुरक्षा दलाच्या जवानांनी कंठस्नान घातले असून परिसरात शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे. भारतीय सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, नियंत्रण रेषेवरील केरन सेक्टरमध्ये काही दहशतवादी घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत होते. यावेळी सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांत जबरदस्त चकमक उडाली. यावेळी सुरुवातीला तीन दहशतवाद्यांना ठार करण्यात आले. त्यानंतर काहीवेळाने आणखी दोन दहशतवाद्यांना भारतीय जवानांनी ठार केले. यानंतर सुरक्षा दलाने परिसरात शोधमोहीम सुरू केली आहे.
 
रमजान महिन्यात सीमावर्ती भागात शांतता राहावी यासाठी भारताने सीमेवर गोळीबार न करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र पाकिस्तान ऐकायला तयार नाही. भारताच्या या निर्णयानंतरही दहशतवाद्यांनी घुसखोरीचा प्रयत्न केला. भारताच्या जवानांनी हा प्रयत्न उधळून लावत दहशतवाद्यांना चांगलीच अद्दल घडविली.
@@AUTHORINFO_V1@@