उत्तर भारतात पावसामुळे ५३ जणांचा मृत्यू

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Jun-2018
Total Views |



उत्तर भारतामध्ये सुरु असलेल्या मान्सून पूर्व वादळी पावसामुळे उत्तर भारतामध्ये काल एका दिवसामध्ये एकूण ५३ जणांचा मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे उत्तर प्रदेश आणि बिहार या दोन राज्यांमध्ये प्रामुख्याने या घटना घडल्याअसून येत्या ४८ तासांमध्ये याठिकाणी आणखी जोरदार पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. त्यामुळे नागरिकांना सावध राहण्याच इशारा देण्यात आला आहे.

उत्तरप्रदेश झारखंड आणि बिहारच्या बहुतांश भागांमध्ये गेल्या दोन दिवसांपासून जोरदार वादळी पावसाने हजेरी लावली आहे. यामध्ये काल झालेल्या जोरदार पावसामुळे यातिन्ही राज्यांमध्ये अनेक ठिकाणी वीज पडल्याच्या घटना घडल्या. या दुर्घटनेत बिहारमध्ये सर्वात अधिक नागरिकांचे बळी गेले असून बिहारमध्ये काल एका दिवसामध्ये तब्बल २९ जणांचा तर उत्तर प्रदेशमध्ये एकूण ११ जणांचा मृत्यू झाला. झारखंडमध्ये देखील ९ जणांचा यामुळे मृत्यू झाला आहे.

दरम्यान पुढील ४८ तास उत्तरेत अशाच प्रकारचा पाऊस पडणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. त्यामुळे नागरिकांनी स्वतःची काळजी घ्यावी, असा सल्ला हवामान खात्याने दिला आहे. तसेच स्थानिक राज्य सरकारांनी देखील नागरिकांसाठी काही सूचना जारी केल्याअसून नागरिकांना विनाकारण घराबाहेर न पडण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
@@AUTHORINFO_V1@@