पुणेकर आज पावसाने सुखावले, पुण्यात पावसाच्या जोरदार सरी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-Jun-2018
Total Views |
 

 
 
 
पुणे : पुणेकरांना आज मान्सूनच्या पहिल्या पावसाचा अनुभव घ्यायला मिळाला. पुण्यातील बऱ्याच भागांमध्ये पावसाच्या जोरदार सरी बरसल्या यामुळे पुणेकर चांगलेच सुखावले आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून उकाड्याने पुणेकर चांगलेच हैराण झाले होते मात्र आता पुण्यात मान्सूनचे आगमन झाल्याने पुणेकर सुखावले आहेत. केरळमध्ये दोन दिवसांपासून मान्सून दडी देवून बसला होता शेवटी तो आता महाराष्ट्रात दाखल झाला आहे. 
 
 
 
 
 
औरंगाबाद, पुणे या शहरांमध्ये आज पावसाने हजेरी लावली आहे. आता लवकरच मान्सून संपूर्ण महाराष्ट्रात आपली हजेरी लावणार आहे. सोशल मीडियावर सगळ्यांनी पहिला पाऊस पडल्याचा आपला आनंद शेअर केला आहे. सध्या ट्वीटरवर ‘पुणे’ , ‘पहिला पाऊस’ हे ट्रेंडमध्ये सुरु आहेत. हिंजवडी, प्रभात रोड, सदाशिव पेठ, कोथरूड, बाणेर अशा महत्वाच्या ठिकाणी आज पावसाने हजेरी लावत पुणेकरांना पुन्हा एकदा सुखाचा अनुभव दिला आहे. 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@