सैनिकी प्रशिक्षणात स्वतःची वेगळी वाट निर्माण करण्याचे सामर्थ्य : नि. ब्रि. बागूल

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-Jun-2018
Total Views |
 
 
 
 
नाशिक : ८१ वा उन्हाळी सैनिकी प्रशिक्षण समारोप समारंभ भोसला मिलिटरी स्कूल येथे पार पडला. ब्रिगेडिअर (निवृत्त) बागूल आणि सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीचे सरकार्यवाह प्रमोद कुलकर्णी, नाशिक विभागाचे उपाध्यक्ष आशुतोष रहाळकर, कार्यवाह डॉ. दिलीप बेलगावकर, सहकार्यवाह नितीन गर्गे, भोसला मिलिटरी स्कूलचे अध्यक्ष अतुल पाटणकर, उपाध्यक्ष प्रशांत नाईक, सदस्य शीतल देशपांडे, नरेंद्र वाणी, राजाभाऊ गुजरात, प्राचार्या गौर आदी उपस्थित होते.
 
कार्यक्रमाची सुरुवात डॉ. मुंजे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून झाली. महिन्याभराच्या कालावधीत विद्यार्थ्यांनी घेतलेल्या घोडेस्वारीचे, स्वसंरक्षणाचे योग आणि युद्धकलेशी निगडित वेगवेगळ्या प्रकारचे प्रशिक्षण याचे प्रात्यक्षिक यावेळी सादर करण्यात आले. भोसला मिलिटरी स्कूलच्या देवांश शहा आणि आदित्य निकम या एनडीएमध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे सरकार्यवाह प्रमोद कुलकर्णी यांनी केले. शिबीर याविषयी मनोगत प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांनी मांडले.
 
या सैनिकी प्रशिक्षण शिबिरामध्ये एकूण ३४० विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवला होता. १५ ते १८ वर्षे या वयोगटातील विद्यार्थी यात सामील झाले होते. शिबिरामध्ये गोवा, कर्नाटक, हरियाणा, मध्यप्रदेश, गुजरात, आंध्र प्रदेश, बिहार, सिलवासा, पश्चिम बंगाल, आसाम, दिल्ली आणि महाराष्ट्र या राज्यातून या शिबिरासाठी विद्यार्थ्याचा सहभाग होता. या शिबिराचे मुख्य वैशिष्ट्य राष्ट्रीय एकात्मता आणि नेतृत्वगुण याचे प्रशिक्षण हे होते. सहा प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर पार पडले. ड्रिल, योग, पिटी, शस्रास्र प्रशिक्षण, फायरिंग, स्विमिंग, रायडींग, सेल्फ डिफेन्स, फिल्ड क्राफ्ट, मॅप रिडींग, आपत्ती व्यवस्थापन अशा अनेक विषयांचे प्रशिक्षण विद्यार्थ्यांना देण्यात आले. संपूर्ण प्रशिक्षणाच्या कालावधीमध्ये प्रशिक्षणार्थी जवळपास १९० किलोमीटरचे अंतर पायी चालले आहेत.
 
यादरम्यान नाशिक रोड कॅम्प आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूल आणि आर्टिलरी सेंटर येथे शस्त्र प्रशिक्षण ग्राऊंडची माहिती, ड्रायव्हिंग सिम्युलेटर, ट्रेनिंग सेंटर शूटिंग रेंज, ड्रिल स्क्वेअर हे विद्यार्थ्यांना दाखविण्यात आले. ब्रिगेडिअर बागूल आपल्या मार्गदर्शनात म्हणाले की, ”प्रशिक्षण शिबिराबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना स्वतःची वेगळी वाट निर्माण करण्याचे सामर्थ्य आणि परिस्थितीसमोर या प्रकारचे हात न टेकण्याचे धाडस या शिबिरामुळे निर्माण झाले आहे, असे सांगितले. या शिबिराची सर्वदूर पोहोचलेली कीर्ती आणि या शिबिरात अगोदर सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांच्या या बळावर शिबिराला सुरुवात झाली. गेल्या महिन्याभरात या शिबिरामुळे स्वतःच्या आयुष्याला एक चांगली शिस्त नक्की लागली आहे.”
 
@@AUTHORINFO_V1@@