भारत आणि चीन या देशांचे वैश्विक व्यापारावर प्रभुत्व : नरेंद्र मोदी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-Jun-2018
Total Views |
 
 
 
 
 
सिंगापूर : भारत आणि चीन या दोन्ही देशांचे गेल्या कित्येक वर्षांपासून जागतिक व्यापारावर प्रभुत्व आहे असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले आहे. तीन देशांच्या दौऱ्यावर गेलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या दुसऱ्या दौऱ्यात सिंगापूर येथील नान्यांग तंत्रज्ञान विश्वविद्यालयमध्ये विद्यार्थ्यांना संबोधित करतांना बोलत होते. यावेळी नरेंद्र मोदी यांनी 'ट्रांसफॉर्मिंग थ्रू इनोवेशन' या विषयावर चर्चा केली. 
 
 
 
आशियातील देश हे २१ व्या शतकातील उभरते देश आहे असे संपूर्ण जग मानते तसेच २१ वे शतक हे आशियामधील देशांचे शतक आहे हे देखील संपूर्ण विश्वाला माहित आहे. त्यामुळे या बाबींचा आपण संधी म्हणून उपयोग करायला हवा तसेच या संधीचा आपल्या विकासासाठी वापर करायला हवा असे त्यांनी यावेळी म्हटले. मानवी इतिहासात शेकडो वर्षांपासून चीन आणि भारताचा व्यापार हा प्रभुत्व गाजवत आला आहे असेही ते यावेळी म्हणाले. 
 
 
 
एकमेकांशी संघर्ष करून काहीही सध्या होणार नाही म्हणून संघर्ष न करता आपल्याला संपर्क वाढवण्याचा प्रयत्न करणे गरजेचे आहे. मागील २००० वर्षांमधील १६०० वर्षांमध्ये जगाचा जीडीपी दर वाढवण्यात ५० टक्के योगदान हे चीन आणि भारताचे आहे अशीही माहिती त्यांनी यावेळी दिली. आपल्याला समस्या आणि आव्हान स्वीकारावे लागेल आणि यातून नवे जग निर्माण करावे लागेल असा संदेश त्यांनी यावेळी या विद्यार्थ्यांना दिला. 
 
 
@@AUTHORINFO_V1@@