बोधगया बॉम्बस्फोटातील आरोपींना आजन्म कारावास

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-Jun-2018
Total Views |

एनआयएच्या विशेष न्यायालयाने सुनावली शिक्षा




पटना :
२०१३ मध्ये बोधगया येथे झालेल्या साखळी बॉम्बस्फोटातील सर्व आरोपींना आज आजन्म कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) पटना येथील विशेष न्यायालयाने ही शिक्षा सुनावली असून याच बरोबर या घटनेतील सर्व आरोपींना प्रत्येकी १० हजार रुपयांचा दंड देखील न्यायालयाने सुनावला आहे.

घटनेतील मुख्य आरोपी असलेले हैदर अली, इम्तियाज अन्सारी, मुजिबुल्हा अन्सारी, उमर सिद्धिकी आणि अझर कुरैस या चौघांनाही आज पटना न्यायालयासमोर हजर केले होते. पटना न्यायालयाचे विशेष न्यायाधीश मनोज कुमार सिन्हा यांच्या समोर पाच आरोपींची सुनावणी करण्यात आली. २०१३ झालेला बॉम्बस्फोट आणि त्यानंतर एनआयएने आपल्या कारवाईमध्ये केलेल्या सर्व तपासाचे अहवाल आणि पुरावे न्यायालयासमोर सादर केले. एनआयएच्या या सर्व पुराव्यांनंतर सिन्हा यांनी या सर्व आरोपींना दोषी ठरवत आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली. दरम्यान शिक्षेच्या सुनावणीनंतर घटनेतील पाचही आरोपींना तुरुंगाकडे रवाना करण्यात आले आहे.

बोधगया येथील महाबोधी मंदिरामध्ये ७ जुलै २०१३ मध्ये साखळी बॉम्बस्फोट घडवून आणण्यात आला होता. विशेष म्हणजे मंदिराला आणि येथील नागरिकांना लक्ष करूनच हा स्फोट घडवला गेला होता. यामध्ये दोन बौद्ध साधूंसह अनेक जणांचा मृत्यू झाला होता. यानंतर याठिकाणी पोलिसांना तपासामध्ये आणखी काही जिवंत बॉम्ब आढळून आले होते. परंतु सुदैवाने त्यांचा स्फोट न झाल्यामुळे पुढील हानी टळली होती. यानंतर हे प्रकरण एनआयएकडे सोपवण्यात आले होते. यानंतर एनआयएने यावर आरोपपत्र दाखल केले होते.
@@AUTHORINFO_V1@@