महाराष्ट्र जमीन महसूल प्रारूप अधिसूचना प्रसिद्ध

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-Jun-2018
Total Views |
 
 
 
 
नाशिक : महाराष्ट्र जमीन महसूल (सरकारी जमिनीची विल्हेवाट करणे) नियम १९७१ मध्ये सुधारणा करणार्‍या अधिसूचनेचे इंग्रजी व मराठीमधील प्रारूप ८ मे रोजीच्या शासन राजपत्रात प्रसिद्ध करण्यात आले आहे. जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी व तहसीलदार कार्यालयात प्रदर्शित करण्यात आले आहे. या अधिसूचनेच्या अनुषंगाने नागरिकांना काही हरकती व सूचना करायच्या असल्यास १५ जून पर्यंत शासनास सादर कराव्यात, असे विभागीय कार्यालयाच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.
 
सदर नियमांना महाराष्ट्र जमीन महसूल (सरकारी जमिनीची विल्हेवाट करणे) (द्वितीय सुधारणा) नियम २०१८ असे संबोधण्यात येणार आहे. प्रारूप अधिसूचनांनुसार नियम १९७१ च्या नियम ३७ नंतर नियम ३७ अ समाविष्ट करण्यात आला आहे. नियम ३७ अ अन्वये शासकीय किंवा नझूल जमीन प्रदान करताना या नियमातील वरील निर्बंध लागू होणार नसल्याचे मुख्य नियमांच्या नियम ५० खालील पहिल्या परंतुकानंतर समाविष्ट करण्यात आले आहे.
 
महानगरपालिका किंवा नगर परिषद क्षेत्रातील भूखंडालगत असलेल्या घराजवळची बोळ, सफाई गल्ली, शासकीय किंवा नझूल जमीनलगतचा भूखंडधारक ज्या धारणाधिकारावर उक्त भूखंड तो धारण करीत असेल, त्याच धारणाधिकारानुसार रक्कम देण्याचे त्याला मान्य असेल, अशा जमिनीचे भोगवटामूल्य कितीही असले तरी जिल्हाधिकारी अशी जमीन लगतच्या भूखंडधारकास प्रदान करण्यास सक्षम राहतील.
 
अशा आहेत नवीन सुधारणा
 
जर लगतच्या भूखंडधारकाने, धारण केलेला भूखंड हा शासकीय किंवा नझूल जमीन असून, असा भूखंड संबंधितांनी भाडेपट्ट्याने धारण केलेला असल्यास, घराजवळची बोळ किंवा सफाई गल्ली जमीन, लगतचा भूखंडधारक यांना शासनाच्या प्रचलित धोरणानुसार रक्कम आकारून आणि वसूल करून भाडेपट्ट्याने प्रदान करण्यात येईल.
 
 
जर लगतच्या भूखंड धारकाने, धारण केलेला भूखंड हा शासकीय किंवा नझूल जमीन असून, असा भूखंड संबधितांनी कब्जेहक्काने धारण केलेला असल्यास, घराजवळची बोळ किंवा सफाई गल्ली जमीन, लगतचा भूखंडधारक यांना शासनाच्या प्रचलित धोरणानुसार कब्जेहक्काची रक्कम आकारून आणि वसूल करून भाडेपट्ट्याने प्रदान करण्यात येईल.
 
 
उपरोक्त नमूदप्रमाणे वसूल केलेल्या रकमेशिवाय ज्या दराने लगतचा भूखंडधारक अशा जागेसाठी आकारणी देत असेल, त्याच दराने अशा घराजवळची बोळ किंवा सफाई गल्लीतील जमीनीची आकारणी देय राहील
 
 
जर लगतच्या भूखंड धारकाने धारण केलेला भूखंड हा शासकीय किंवा नझूल जमीन असून असा भूखंड संबंधितांनी भोगवटादार वर्ग -२ या धारणाधिकाराने धारण केलेला असल्यास, घराजवळची बोळ किंवा सफाई गल्ली जमीन लगतचा भूखंडधारक यांना शासनाच्या प्रचलित धोरणानुसार अशा प्रदानासाठीची देय रक्कम आकारून आणि वसूल करून भोगवटादार वर्ग-१ या धारणाधिकाराने प्रदान करण्यात येईल.
 
 
@@AUTHORINFO_V1@@