अमेरिका-उ.कोरिया भेट १२ जूनलाच

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-Jun-2018
Total Views |



वॉशिंग्टन डी.सी. : अमेरिका आणि उत्तर कोरिया यांच्यातील बिघडलेले संबंध आता पुन्हा एकदा रुळावर येऊ लागले असून राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि किम जोंग उन यांची प्रस्तावित भेट ही १२ जूनलाच होणार असल्याचे अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून आज स्पष्ट करण्यात आले आहे. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माईक पोम्पिओ यांनी याविषयी माहिती दिली असून भेटीसाठी आवश्यक असलेली सर्व तयारी जवळजवळ पूर्ण होत आली असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन डी.सी. येथे ट्रम्प आणि किम यांच्या भेटीच्या पार्श्वभूमीवर परराष्ट्र मंत्रालयाकडून एक पत्रकार परिषद घेण्यात आली होती. या परिषदेमध्ये पत्रकारांना उद्देशून बोलताना पोम्पिओ यांनी याविषयी माहिती दिली. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी उत्तर कोरियाला पूर्णपणे आण्विक शक्तीचा त्याग करण्याचे निर्देश दिले आहे. उत्तर कोरियाने जर अणु उर्जेचा वापर न करण्याविषयी अमेरिकेला वचन दिले तर ते उत्तर कोरियाच्या उज्ज्वल भविष्याच्या दृष्टीने अत्यंत सकारात्मक असे पहिले पाऊल असेल, असे अमेरिकेने स्पष्ट केले आहे. त्यामुळे या भेटीमागील अमेरिकेचे उद्दिष्ट पूर्णपणे स्वच्छ आणि उघड असून सुदैवाने उत्तर कोरियाने देखील याला सकारात्मक प्रतिसाद दिला असल्याचे पोम्पिओ यांनी सांगितले.




याचबरोबर ही भेट दोन्ही देशांसाठी अत्यंत ऐतिहासिक अशी असून ट्रम्प यांचे हे एक मोठे यश मानावे लागणार आहे. या भेटीनंतर कोरियन द्वीपकल्पामध्ये शांती आणि स्थैर्य स्थापन होणार आहे. तसेच दोन्ही देशांमधील संबंध देखील सुधारणार असून ही अशी संधी अमेरिका कधीही दवडणार नाही, असे पोम्पिओ यांनी यावेळी स्पष्ट केले.
@@AUTHORINFO_V1@@