डोंबिवलीत आज भरणार आगळावेगळा चटणी महोत्सवात

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-Jun-2018
Total Views |



डोंबिवलीः मे ना म्हमहिटला कि सर्वत्र वाळवणाच्या पदार्थांचा सुवास दरवळू लागतो. चटणी, पापड, लोणची व मसाले बनवून ते वर्ष भर वापरण्याची महाराष्ट्राची परंपरा आहे. या परंपरेला साद घालणारा चटणी महोत्सवात डोंबिवलीकरां साठी आयोजित करण्यात आला आहे. राम बंधू आचार व रोट्रॅक्टक्लब ऑफ डोंबिवली मिडटाउन युथ यांच्या वतीने डोंबिवलीकर महिलांसाठी एका आगळ्या वेगळ्या चटणी मोहोत्स्वाचे आयोजन करण्यात आले आहे . या महोत्सवात विविध प्रकारच्या चटण्या ,पापड, लोणची ठेण्यात येणार असून येत्या दि. २ व ३ जून रोजी पूर्वेतील सर्वेश हॉल येथे हा महोत्सवात पार पडणार आहे .

पूर्वीच्या काळी महिला उन्हाळा सुरु होताच वाळवणाचे पदार्थ तयार करायच्या. सद्य स्थितीला महिला कामानिमित्त बाहेर पडत असल्याने घरघुती वाळवणाच्या पदार्थांचां विसर पडू लागला आहे. या पदार्थांसाठी ह्या चटणी महोत्सवात आयोजन केले असल्याची माहिती रोट्रॅक्टक्लब ऑफ डोंबिवली मिडटाउन युथ चे अध्यक्ष श्रीजय कानिटकर यांनी दिली. या महोत्सवात सुमारे १८ स्टॉल ठेवण्यात आले असून यात नाशिक , जळगाव , सातारा ,सांगली तसेच इतर ठिकाणाच्या चटण्याचा आस्वाद डोंबिवलीकरांना घेता येणार आहे. एका स्टॉलवर सुमारे ५ ते ७प्रकारच्या चटण्या ठेवण्यात येणार आहे. लोणच्यांचे १५ प्रकार तर पापडांचे १० ते १२प्रकार येथे ठेवण्यात येणार आहे. यात २ स्टॉल बचत गटांच्या महिलांसाठी तर एक स्टॉल अन्वय नरकर यांचा एक स्टॉल आहे तर बाकी स्टॉल या हौशी घरगुती महिलासाठी व पोळीभाजी केंद्र चालविणार्‍या महिलांसाठी राखीव ठेवण्यात आले आहे. या महोत्सवात कानिटकर यांच्या आजी भारती करमरकर यांनी हि स्वतःचा चटण्यांचा स्टॉल ठेवला आहे त्यांचे वय सुमारे ७८ वर्षे इतके आहे. नातवाना आवडणार्‍या चटण्या त्या महोत्सवात ठेवणार आहे.

@@AUTHORINFO_V1@@