भारत आणि सिंगापूर यांच्यात आठ करार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-Jun-2018
Total Views |

सिंगापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सिंगापूर दौऱ्याच्या दिवशी दोन्ही देशांमध्ये द्विपक्षीय चर्चा झाली असून चर्चेनंतर दोन्ही देशांमध्ये एकूण आठ करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सिंगापूरचे पंतप्रधान ली सीन लुंग यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या तसेच करारांचे परस्पर हस्तांतरण करण्यात आले.

माहिती तंत्रज्ञानाची देवाणघेवाण, सागरी व्यापार आणि सुरक्षा, सायबर सुरक्षा, अवैध्या तस्करी, प्रशासन व्यवस्थापन आणि आर्थिक सहयोग या प्रमुख विषयांवर हे आठ करार करण्यात आले आहेत. यानुसार दोन्ही देशांचे नौदल, आर्थिक संस्था, प्रशासकीय यंत्रणा यांच्यातील परस्पर संबंध वाढवण्यावर भर देण्यात येणार आहे. जेणेकरून दोन्ही देशाच्या अंतर्गत आणि सागरी सुरक्षा राखली जाईल.

या करारांबरोबरच भारतामध्ये सुरु असलेल्या काही विकास प्रकल्पांविषयी देखील यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. यामध्ये पुणे येथील प्रस्तावित विमानतळाचा विकास आराखडा, आंध्रप्रदेशची नवी राजधानी म्हणून विकसित करण्यात येणाऱ्या 'अमरावती' शहराचा विकास आरखडा, स्मार्ट सिटी प्रकल्प आदी बाबींवर सिंगापूर पंतप्रधानांशी मोदींनी चर्चा केली.



याचबरोबर या दौऱ्यामधील आणखी एक उल्लेखनीय बाब म्हणजे यापुढे भारतामध्ये वापरल्या जाणाऱ्या रूपे, भीम आणि युपीआय या ऑनलाईन व्यवहार पद्धतींचा वापर सिंगापूरमध्ये देखील करण्यात येणार आहे. परस्पर आर्थिक सहकार्य वाढवण्यासाठी म्हणून सिंगापूरने आपल्या देशामध्ये भारतीय व्यवहार पद्धती वापरण्यासाठी परवानगी दिली असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या व्यवहार पद्धतींचे काल सिंगापूरमध्ये उद्घाटन केले आहे. त्यामुळे यापुढे भारतीय पर्यटकांना सिंगापूरमध्ये भीम, युपीआय आणि रूपे कार्डचा वापर आर्थिक व्यवहारांसाठी करता येणार आहे.
@@AUTHORINFO_V1@@