यवतमाळमधील भीषण अपघातामध्ये १० जण ठार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-Jun-2018
Total Views |


यवतमाळ : जिल्ह्यातील आर्णी येथे आज सकाळी एक भीषण अपघात झाला असून या अपघातामध्ये १० नागरिकांचा जागीच मृत्यू झाला आहे. तसेच ३ जण गंभीररीत्या जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी म्हणून यवतमाळमधील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या या तिघांनाही अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले असून डॉक्टरांकडून त्यांच्यावर सातत्याने उपचार सुरु आहेत.

आर्णी तालुक्यातील यवतमाळ-नांदेड मार्गाजवळील कोसदनी घाटात हा भीषण अपघात झाला आहे. यामध्ये एक तवेरा गाडी समोर येणाऱ्या ट्रकला जाऊन धडकल्यामुळे हा अपघात झाला. पहाटेच्या अंधारमध्ये वाहन चालक अंदाज न आल्यामुळे दोन्ही वाहने अत्यंत वेगाने एकमेकांना समोरासमोर येऊन धडकली. यामुळे दोन्ही गाड्यांचे अक्षरशः चक्काचूर झाला. अपघाताचा आवाज एकूण रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या इतर प्रवाशांनी तातडीने पोलिसांना या घटनेची माहिती दिली. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत, बचावकार्य सुरु केले. परंतु अपघातामध्ये १० नागरिकांचा या अगोदरच मृत्यू झाल्यामुळे पोलिसांनी जखमी नागरिकांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलवले. यानंतर दोन्ही वाहनांना बाजूला करून वाहतुकीसाठी मार्ग मोकळा केला.

दरम्यान पोलिसांनी घटनेचा रीतसर पंचनामा नोंदवून अपघाताची नोंद करून घेतली. परन्तु अपघाताचे नेमके कारण मात्र अद्याप स्पष्ट झाले नसल्यामुळे पोलिसांकडून काही प्राथमिक अंदाज यासंबंधी वर्तवण्यात आले आहे. पहाटेच्या अंधारात चालकाला समोर येणाऱ्या वाहनाचा अंदाज न लागल्यामुळे तसेच झोपेमुळे वाहनचालकाचा वाहनावरील ताबा सुटल्यामुळे हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.
@@AUTHORINFO_V1@@