'तुमच्यासारख्या लोकांकडूनच न्यायपालिकेची हत्या'

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-May-2018
Total Views |

वरिष्ठ न्यायाधीश अरुण मिश्रा यांनी केली वकिलांची कान उघडणी




नवी दिल्ली :
सर्वोच्च न्यायालयाचे वरिष्ठ न्यायाधीश अरुण मिश्रा यांनी बेशिस्त वागणाऱ्या वकिलांची आज चांगलीच कानउघडणी केली आहे. तुम्हा सर्वांमुळे आज न्यायपालिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असून या बेशिस्त वागण्यामुळेच न्यायपालिकेची एकप्रकारे हत्या होत असल्याची संतप्त प्रतिक्रिया मिश्रा यांनी दिली आहे.

केरला मेडिकल कॉलेजच्या प्रवेश प्रक्रियेतील घोटाळ्यासंबंधी मिश्रा हे आज न्यायालयात सुनावणी करत होते. यावेळी वकिलांच्या बेशिस्तपणावर चिडलेल्या मिश्रा यांनी वकिलांची चांगलीच कानउघडणी केली. मिश्रा म्हणाले कि,' या ठिकाणी सर्व जण एक सारखे आहेत. त्यामुळे तुम्ही लोक सर्व न्यायाधीशांना लक्ष करू पाहात आहात. एकाच बाणामध्ये तुम्ही सर्व पक्षी मारण्याचा प्रयत्न करत आहात, परंतु तुमच्या अशा वागण्यामुळे न्यायपालिकेची एकप्रकारे हत्या होत असून न्यायपालिका जर नष्ट झाली तर कोणीही व्यवस्थित जगू शकणार नाही' अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली. तसेच काही जणांना जर याठिकाणी दिलेला निकाल रुचला नाही, तर ते लोक सरळ माध्यमांसमोर जाऊन आपले मत मांडू लागले आहेत. यामुळे न्यायपालिकेतील न्यायाधीशांवर सगळे जण प्रश्न निर्माण करू लागले आहेत, परंतु हे अत्यंत चुकीचे असल्याचे म्हणत त्यांनी यावर आपली नाराजी प्रकट केली.

गेल्या काही दिवसांपासून न्यायव्यवस्थेविषयी देशातील काही राजकीय पक्षांकडून वारंवारपणे प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाऊ लागले आहे. देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कॉंग्रेसने तर थेट सरन्यायाधीशांवर महाभियोग भरवण्याची तयारी सुरु केलेली आहे. त्यामुळे देशात न्यायव्यवस्थेविषयी अनेक प्रश्न सामान्य जनतेकडून उपस्थित केले जाऊ लागले आहेत. त्यामुळे न्यायपालिकेच्या अस्तित्वालाच धोका निर्माण होऊ लागला आहे.
@@AUTHORINFO_V1@@