इराणला देखील अणु उर्जा वापराचा अधिकार : भारत

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-May-2018
Total Views |

अमेरिका-इराण अणु करारावर चर्चेतून काढावा मार्ग




नवी दिल्ली : 'अणु उर्जेचा शांततामय मार्गाने वापर करण्याचा इराणला पूर्ण अधिकार असून अमेरिकेने यावर चर्चच्या माध्यमातून मार्ग काढावा' असे आवाहन भारताकडून करण्यात आलेले आहे. इराणबरोबर झालेल्या अणु करारामधून बाहेर पडण्यासंबंधी अमेरिकेने केलेल्या घोषणेवर आज भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने आपली प्रतिक्रिया दिली आहे.

'इराण जर अणु उर्जेचा वापर आपल्या देशाच्या प्रगतीसाठी तसेच इतर देशांच्या विकासासाठी करू इच्छित असेल, तर त्याला शांततामय मार्गाने या उर्जेचा वापर करण्याचा पूर्ण अधिकार आहे. त्यामुळे अमेरिकेने अणु करारामधून बाहेर पडण्याअगोदर इराणशी चर्चा करणे अपेक्षित आहे. या चर्चेतून मार्ग काढल्यास तो या दोन्ही देशांबरोबरच सर्व जगाच्या हिताचा ठरेल' असे भारताने नोंदवले आहे.

दरम्यान भारताबरोबरच रशिया, इंग्लंड, चीन आणि जर्मनीने देखील अणु करारावरून इराणची बाजू घेतलेली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या निर्णयावर पुन्हा एकदा विचार करून यावर निर्णय घ्यावा, असे मत या सर्व देशांनी व्यक्त केले आहे. रशियाने तर अमेरिकेच्या या निर्णयावर नाराजी व्यक्त करत, अमेरिकेने कोणाच्याही हक्कावर गदा आणू नये, असे मत व्यक्त केले आहे.
@@AUTHORINFO_V1@@