केबलमधील बिघाडानेच झाली वीज गुल

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-May-2018
Total Views |

महावितरणकडून हुडको उपकेंद्रात दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर

जळगाव :
रणरणत्या उन्हाचा पारा ४५ पर्यंत पोहोचल्याने मे महिना जनतेसाठी हिट ठरला आहे. त्याचा विपरित परिणाम बाजारपेठेत जाणवत आहे. शहरात भर दुपारी रस्त्यांवर शुकशुकाट दिसत आहे. अशातच गेल्या दोन दिवसापासून केबलमधील बिघाडामुळेच वीज गुल झाली होती. त्यामुळे जनतेला रात्रीही उकाड्यामुळे त्रास सहन करावा लागला होता. एमआयडीसीतील १३२ केव्ही केंद्राला वीज पुरवठा करणार्‍या हुडको उपकेंद्रातील केबलमध्ये(पंक्चर) तांत्रिक बिघाड झाल्याने वीज पुरवठा खंडित केला होता. त्याच्या दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरु असून परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती महावितरणमधील सूत्रांनी ‘तरुण भारत’ला दिली.
 
 
जळगाव ते बांभोरी दरम्यान टॉवर लाईनवर बिघाड झाल्याने सोमवारी रात्री ११ वाजेपासून शहरात बहुतेक ठिकाणी लाईट गुल झाली होती. त्या बिघाडातील दुरुस्तीचे काम महावितरणच्या कर्मचार्‍यांकडून सुरु होते. शहरातील काही भागांमध्ये रात्री उशिरापर्यंत वीजपुरवठा सुरळीत सुरु करण्यात आला.
जनतेने अनावश्यक वीजेचा वापर टाळावा
सध्या सर्वत्र वाढत्या तापमानामुळे वीजेची मागणी वाढली आहे. शासकीय कार्यालयासह घरातील अनावश्यक उपकरणे बहुतांश सुरु ठेवल्या जातात. अशावेळी वीजेची बचत करणे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. त्यामुळे जनतेने अनावश्यक वीजेचा वापर टाळण्याची खबरदारी घेण्याची खरी गरज आहे. वीजेची बचत करण्यास मदत होईल, अशी माहिती महावितरण विभागातील अधिकार्‍यांनी दिली.
हुडकोवरील केबल नादुरुस्त
दिवसेंदिवस तापमानात वाढ झाल्याने वीजेची मागणी वाढली आहे. जिल्ह्याला लागणारा वीजपुरवठा सुमारे १ हजार मेगावॅट आहे. महावितरणकडे सद्यस्थितीला तेवढा वीजपुरवठा उपलब्धही आहे. मात्र, वाढत्या तापमानाचा फटका वीज पुरवठ्याला बसत आहे. एमआयडीसीतील १३२ केव्ही केंद्रावरील केबल ट्रीप झाल्यामुळे वीज खंडित होत आहे. हुडकोवरील ३३ केव्ही उपकेंद्रावरील केबलच्या नादुरुस्तीमुळे या समस्येला सामोरे जावे लागले.
 
वाढत्या तापमानाचा फटका
जळगाव शहरात यावर्षीही तापमानाने नाही, नाही म्हणत उच्चांक गाठला आहे. त्यामुळे उकाड्याने जळगावकर त्रस्त झाले आहे. तापमान वाढल्यावर त्याचा भार महावितरण विभागाला होऊ लागला आहे. त्यामुळे वाढत्या तापमानाचा परिणाम वीजेवर झाला आहे. त्याचाच फटका महावितरणासह जनतेला बसला आहे.
परिस्थिती नियंत्रणात...
केबलच्या नादुरुस्तीमुळे वीज गुल होण्याचे प्रमाण वाढले. ऐन रात्री महावितरणाला वीज पुरवठा खंडित करण्याची वेळ आली. मात्र, अशावेळी महावितरणाच्या कर्मचार्‍यांनी अहोरात्र युद्धपातळीवर काम करुन वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले. त्यामुळे आता परिस्थिती नियंत्रणात आणता आली आहे.
 
@@AUTHORINFO_V1@@