महिलांसाठी स्वच्छतागृहे सुप्रीम इंड्रस्टीजचा पुढाकार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-May-2018
Total Views |
जळगाव :
शहरात महिलांचा वावर असलेल्या ठिकाणी सुसज्ज असे एकही स्वच्छतागृह नाही. नोकरी व्यवसायासह बाहेरगावाहून शहरात शिक्षणासाठी येणार्‍या तरूणींची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत आहे. ही समस्या लक्षात घेऊन शहरातील सुप्रीम इंड्रस्टीज कंपनीच्या एच.आर.फडांच्या रकमेतून फुले मार्केटसमोरील जुन्या नगरपालिकेच्या मोकळ्या जागेत लवकरच स्वच्छतागृहे बांधून देणार असल्याची माहिती सुप्रीम इंड्रस्टीजचे महाव्यवस्थापक संजय प्रभूदेसाई यांनी ‘तरूण भारत’ला दिली.
 
 
स्वच्छतागृहांसाठी ई-टॉयलेटचा प्रस्ताव मंजूर झाला होता. पण काही तांत्रिक अडचणींमुळे तो बारगळला होता. त्याऐवजी स्वतंत्र आणि सुसज्ज प्रकारातील पक्के बांधकाम असलेले स्वच्छतागृहे उभारून दिले जाईल. त्यासाठीची प्रक्रिया महानगर पालिकेकडून मंजूर झाली आहे. त्यामुळे लवकरच या कामाला सुरुवात होणार असल्याची माहिती प्रभूदेसाई यांनी दिली. दरम्यान, स्वच्छतागृहांची सोय उपलब्ध झाल्यास महिलांची होणारी कुचंबना थांबण्यास मदत होणार आहे.
 
 
नगरसेविकांची उदासिनता
महानगर पालिकेत असलेल्या पुरुष नगरसेवकांच्या तुलनेत महिला नगरसेविकांची संख्या बरी आहे. महानगर पालिकेत महिलाराज असूनही महिलांच्या या गंभीर समस्येकडे त्यांचे दुर्लक्ष झाले आहे. त्यांच्यातील उदासिनता यामुळे उघड झाली आहे. शासनाच्या स्वच्छ भारत अभियानातर्ंगंत महिलांचा वावर असलेल्या ठिकाणी सुसज्ज स्वच्छतागृह उभारले जावे, असे आदेश शासनाने दिले आहेत. मात्र, नेत्यांच्या जयंती आणि पुण्यतिथीलाच केवळ चमकोगिरी म्हणून स्वच्छता केली जाते. मात्र, महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह उभारले जावे, अशी तळमळ एकाही नगरसेविकांमध्ये नाही, असे म्हणण्याची वेळ महिला वर्गातून व्यक्त होत आहे.
@@AUTHORINFO_V1@@