रेडक्रॉसदिनी जिल्हा थॅलेसेमिया मुक्तीचा संकल्प

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-May-2018
Total Views |
 

 
जळगाव :
सर हेन्री ड्युनंट यांच्या वाढदिवसानिमित्त जगभरात ८ मे रोजी जागतिक रेडक्रॉस दिन साजरा करण्यात आला. त्यानिमित्त विविध कार्यक्रम घेण्यात येवून जिल्हाधिकार्‍यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. सुरूवातीला सर हेन्री ड्युनंट यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून दीपप्रज्ज्वलन करण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी रेडक्रॉसदिनी जिल्हा थॅलेसेमिया मुक्तीचा संकल्प केला.
 
 
गनी मेमन यांनी रेडक्रॉस करीत असलेल्या कामांची सविस्तर माहिती दिली. रक्तपेढीचे चेअरमन डॉ. प्रसन्नकुमार रेदासनी यांनी थॅलेसेमिया मुलांच्या परिवारातील सदस्यांचे जसे रक्ताच्या नात्यातले भाऊ, बहीण ५ ते २५ वर्ष वयोगटातील यांचे थॅलेसेमिया स्क्रीनिंग तपासणी करणार आहोत. त्यामुळे थॅलेसेमिया मायनरची ओळख होईल.
 
 
बालरुग्णांना पोषक आहाराचे वाटप
थॅलेसेमिया स्क्रीनिंग केल्यानंतर लग्नाचा निर्णय घेतल्यास, मुलांना थॅलेसेमिया मेजर होणार नाही. स्क्रीनिंगची सुविधा इंडियन रेडक्रॉस सोसायटी, जळगाव व जळगाव रोटरी वेस्टतर्फे व बायोरॅड लॅब्रोटरिज इंडिया प्रा.लिमिटेड यांच्या सहकार्याने केला जात असल्याचे सांगितले. यावेळी थॅलेसेमिया सिकलसेल बालरुग्णांना पोषक आहाराचे वाटपही करण्यात आले. रेडक्रॉस दिनाचे औचित्य साधून गनी मेमन आणि अँड. सूरज जहांगीर यांनी रेडक्रॉस रक्तपेढीत रक्तदान केले.
 
 
स्माईल कॅपद्वारे सन्मान
रेडक्रॉस दिन ते जागतिक रक्तदाता दिनापर्यत ८ मे ते १४ जूनपर्यंत जे रक्तदाते रक्तदान करतील त्यांना ही स्माईल कॅप सन्मान म्हणून भेट दिली जाईल. याप्रसंगी उपाध्यक्ष गनी मेमन, मानद सचिव विनोद बियाणी, चेअरमन रक्तपेढी डॉ.प्रसन्नकुमार रेदासनी, सचिव रक्तपेढी अनिल कांकरीया, रोटरी जळगाव वेस्टचे अँड. सूरज जहांगीर, कृष्णकुमार वाणी, दिलीप चौबे, डॉ.प्रकाश जैन, डॉ. प्रकाश संघवी, लक्ष्मण तिवारी, प्रशासकीय अधिकारी, टी.आर.जोशी, उज्ज्वला वर्मा- पी.आर.ओ, संजय साळुंखे, सतीश मराठे, नीता नेमाडे, सुनीता वाघ, हुस्ना रंगरेज, इंगळे, किरण बावस्कर, निशिगंधा बागूल, अन्वरखान, रेडक्रॉसचे कर्मचारी व जिल्हा अपंग पुनर्वसन केंद्र केंद्र समन्वयक एस.पी. गणेशकर आदी उपस्थित होते. मानद सचिव विनोद बियाणी यांनी आभार मानले.
@@AUTHORINFO_V1@@