अमित शाह हे देखील कॉंग्रेसचेच : पवन खेरा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-May-2018
Total Views |

नवी दिल्ली : भाजप सरकार हे सातत्यने खोटे बोलून राजकारण करत आले आहे, त्यामुळे वेळ पडली तर अमित शाह हे देखील कॉंग्रेसचेच कार्यकर्ते आहेत. हे देखील पुराव्यासह सिद्ध करण्यास हे लोक मागेपुढे पाहणार नाहीत, अशी टीका कॉंग्रेस नेते पवन खेरा यांनी आज केली आहे. राजीव चंद्रशेखर आणि अर्नब गोस्वामी यांच्याविरोधात चर्चेसाठी कॉंग्रेसकडून घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते.
पंतप्रधान मोदी आणि त्यांच्या भाजप पक्ष हा सातत्याने देशाशी खोटे बोलत आला आहे. यामध्ये त्यांचे राज्यसभा खासदार राजीव चंद्रशेखर आणि त्यांचे सहकारी अर्नब गोस्वामी देखील त्यांना सातत्यने मदत करत आले आहेत. प्रत्येक चुकीच्या गोष्टीमध्ये हे नेहमी कॉंग्रेस पक्षाला जबाबदार धरत असतात, त्यामुळे भविष्यात अमित शाह हे जर काही चुकीची गोष्ट करताना पकडले गेले तर हे लोक शाह हे देखील कॉंग्रेसचेच कार्यकर्ते असल्याचे पुराव्यासह सिद्ध करतील, अशी टीका त्यांनी यावेळी केली.
तसेच राजीव चंद्रशेखर हे आपल्या राजकीय पदाचा गैरफायदा घेत असल्याचा आरोप त्यांनी आपल्या या पत्रकार परिषदेमध्ये केला. राजीव चंद्रशेखर हे भाजपचे खासदार असून त्या मार्फत ते आपला व्यवसाय वाढवत असल्याचा आणि माध्यमांवर अंकुश ठेवत असल्याचा आरोप खेरा यांनी केला. अर्नब गोस्वामी हे देखील त्यांना साथ करत असून गोस्वामी यांच्या विरोधात महाराष्ट्रातील अलिबाग येथील पोलिसांमध्ये गुन्हा देखील दाखल आहे. परंतु त्यांच्यावर सरकार का कारवाई करत नाही ? असा सवाल त्यांनी केला. तसेच गोस्वामींवर सरकारने कारवाई करण्याची मागणी देखील त्यांनी यावेळी केली.

@@AUTHORINFO_V1@@