नरेंद्र मोदी शुक्रवारपासून दोन दिवसीय नेपाळ दौऱ्यावर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-May-2018
Total Views |
 
 
 
 
 
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या शुक्रवारपासून नेपाळच्या दोन दिवसीय दौऱ्यावर जाणार आहेत. नेपाळमधील सगळ्यात जुने शहर जनकपुरला नरेंद्र मोदी भेट देणार आहेत. जनकपुर गावात जानकी मंदिर प्रसिद्ध या मंदिरात नरेंद्र मोदी पूजा करणार असून या संपूर्ण मंदिराची पाहणी ते यावेळी करणार आहे. 
 
 
 
 
रामायणापासून जनकपुर आणि अयोध्या या दोन्ही शहरांमध्ये आध्यात्मिक संबंध घनिष्ठ आहेत. या दोन्ही शहरांचे सामाजिक आणि सांस्कृतिक संबंध मजबूत आहेत. त्यामुळे या संस्कृतीचे दर्शन करण्यासाठी नरेंद्र मोदी नेपाळ दौऱ्यावर जाणार आहेत. नरेंद्र मोदी पहिल्यांदाच जनकपुरला भेट देणार आहेत. सीतेच्या जन्मापासून विवाह पर्यंतच्या घटनाक्रमाला मिथिला चित्रकारीमध्ये चित्रित केले आहे. 
 
 
 
 
मिथिला चित्रकारीचा नमुना येथे खूप चांगल्या प्रकारे चित्रित करण्यात आला आहे. दरवर्षी जगभरातील नागरिक या मंदिराला भेट द्यायला येत असतात. नरेंद्र मोदी यांच्या या दौऱ्यामुळे भारत आणि नेपाळचे संबंध देखील अजून मजबूत होण्यास मदत मिळेल. भारत आणि नेपाळ यांची सामाजिक, सांस्कृतिक विचारसरणी जवळपास एकच आहे. त्यामुळे हा दौरा सांस्कृतिक, सामाजिक एकता वाढवण्यास मदत करेल. 
 
@@AUTHORINFO_V1@@