मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागात विद्युत सप्ताह

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-May-2018
Total Views |

 
 
भुसावळ :
मध्य रेल्वेच्या विद्युत सामान्य सेवा या विभागातर्फे १ ते ७ मे दरम्यान विद्युत सुरक्षा सप्ताह साजरा करण्यात आला. सर्व विभागांच्या विविध कार्यालयात कर्मचार्‍यांमध्ये विद्युत सुरक्षा संबंधित माहिती, जागरुकतेवर मार्गदर्शन करण्यात आले. मंगळवारी मध्यरेल्वेच्या भुसावळ विभागाच्या प्रबंधकांच्या कार्यालयात दुपारी ३ वाजता विद्युत सुरक्षा सप्ताह संबंधित सेमिनार आयोजित करण्यात आले.
 
 
यात डीआरएम आर.के.यादव, विद्युत विभागाचे उच्च अधिकारी तथा वरिष्ठ विद्युत अभियंता उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन सहाय्यक विभागीय विद्युत अभियंता ए.एम.भगत यांनी केले होते. विभागीय वरिष्ठ विद्युत अभियंता एन.के.अग्रवाल यांनी मार्गदर्शन केले.
@@AUTHORINFO_V1@@