भाजपच्या शिष्टमंडळाने घेतली निवडणूक आयोगाची भेट

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-May-2018
Total Views |

नकली ओळखपत्रांविरोधात कठोर करवाई
तसेच
संबंधित मतदार संघात फेरनिवडणूक घेण्याची आयोगाकडे मागणी 



नवी दिल्ली : कर्नाटकमधील राज राजेश्वरी विधानसभा मतदारसंघामध्ये सापडलेल्या बनावट मतदार ओळखपत्रासंबंधी भाजपच्या शिष्टमंडळाने केंद्रीय निवडणूक आयोगाची भेट घेतली आहे. याभेटीमध्ये भाजपने राज राजेश्वरीमध्ये फेरनिवडणूक घेण्यासंबंधी तसेच या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच आयोगाने देखील यावर कारवाईचे आश्वासन दिले असून फेरनिवडणुकीविषयी मात्र अद्याप कसलीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री स्मृती इराणी, केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्री मुक्तार अब्बास नक्वी, जे.पी. नड्ड, मीनाक्षी लेखी या भाजप नेत्यांनी थोड्या वेळापूर्वीच निवडणूक आयोगाची भेट घेतली. या भेटीनंतर या नेत्यांनी माध्यमांशी संवाद साधत, कर्नाटकमध्ये उघड झालेले बनावट मतदान ओळखपत्रांचे संपूर्ण रॅकटे हे अत्यंत चिंतेचा विषय असल्याचे त्यांनी म्हटले. तब्बल १० हजार मतदानपत्र तसेच निवडणूक आयोगाचा होलोग्राम सापडणे म्हणजे लोकशाहीसाठी अत्यंत घातक असल्याचे त्यांनी यावेळी म्हटले. तसेच या संपूर्ण प्रकरणाचा आयोगाने माध्यमांच्या मदतीने अधिक शोध घ्यावा, अशी मागणी भाजपने केल्याचे इराणी यांनी यावेळी सांगितले. याच बरोबर राज राजेश्वरीमध्ये होणारी विधानसभेची निवडणूक पुन्हा एकदा घेण्यात यावी, अशी देखील मागणी त्यांनी यावेळी केली.


काल रात्री कर्नाटकातील राज राजेश्वरी मतदारसंघातील एका फ्लॅटमध्ये तब्बल ९ हजार ७४६ बोगस मतदान ओळखपत्रे सापडली होती. याचबरोबर ओळखपत्र छपाईसाठीचे छपाई यंत्र, एक कॉम्प्युटर, निवडणूक आयोगाचे होलोग्राम, आयोगाचे अर्ज आणि नागरिकांची काही गोपनीय माहिती याठिकाणी सापडली. यानंतर भाजप आणि कॉंग्रेस या दोन्ही पक्षांमध्ये एकमेकांवर आरोपप्रत्यारोप करण्याची जणू स्पर्धाच सुरु झाली होती. कॉंग्रेसच्या मते या मागे भाजपचा हात आहे, तर भाजपच्या सांगण्यानुसार यामध्ये कॉंग्रेस पक्षाचा हात आहे. त्यामुळे कर्नाटकमध्ये एक नवा राजकीय वाद यामुळे रंगलेला आहे.
@@AUTHORINFO_V1@@