काँग्रेसच्या जाहीरनाम्या विरोधात याचिका दाखल

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-May-2018
Total Views |
 
 
 
 
 
धर्माच्या नावावर मत मागितल्याचा आरोप 
 
 
कर्नाटक : अवघ्या काही दिवसांवर येवून ठेपलेल्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या ऐन तोंडावर काँग्रेस पक्षाच्या जाहीरनाम्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. काँग्रेस पक्ष धर्माच्या नावावर मत मागत असल्याचा आरोप या याचिकेत करण्यात आला असून उद्या या प्रकरणावर सुनावणी करण्यात येणार आहे. 
 
 
 
कॉंग्रेसच्या जाहीरनाम्यात धर्माच्या नावावर मत मागण्यात येत असल्याचा आरोप या याचिकेत काँग्रेस विरुद्ध करण्यात आला आहे. उद्या सर्वोच्च न्यायालयात या याचिकेवर सुनावणी करण्यात येणार असून ही याचिका कुणाकडून दाखल करण्यात आली आहे याविषयी अद्याप माहिती पुढे आलेली नाही. 
 
 
 
काँग्रेसने या जाहीरनाम्यात ज्या घोषणा केल्या आहेत त्यावरून असे दिसते की, काँग्रेस धर्माच्या आधारावर निवडणुका जिंकण्याचा प्रयत्न करीत असून हे करणे चुकीचे आहे असे या याचिकेत नमूद केले आहे. सध्या संपूर्ण देशात कर्नाटक विधानसभा निवडणुकीकडे जनतेचे लक्ष लागले आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस आपापल्या परीने प्रचार करीत आहेत. 
 
  
भाजपसाठी कर्नाटक निवडणुका या २०१९ ची तयारी असून काँग्रेससाठी कर्नाटक निवडणुका या राजकीय प्रतिष्ठेचा विषय बनला आहे. त्यामुळे दोन्ही पक्ष जोरात या निवडणुकीमध्ये प्रचार करीत आहेत. कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात एकूण ५८ हजार मतदान केंद्रे उभारण्यात येत असल्याची माहिती काल कर्नाटकचे मुख्य निवडणूक अधिकारी संजीव कुमार यांनी देखील दिली होती. 
 
@@AUTHORINFO_V1@@