पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये भूकंपाचे जोरदार झटके

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-May-2018
Total Views |
 
 
 
 
 
पाकिस्तान : भारताचे शेजारील देश पाकिस्तान आणि अफगाणिस्तान येथे आज भूकंपाचे जोरदार झटके बसले आहे. ५.१ रेस्टर इतकी भूकंपाची तीव्रता होती. त्यामुळे पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील काही घर आणि इमारती यांना नुकसान झाले असल्याची माहिती मिळत आहे. भूकंपाचे हादरे बसताच नागरिकांनी घरातून मैदानी भागाकडे पळ काढला. 
 
 
 
 
या भूकंपात कोणतीही जीविन हानी झाली नसली तरी देखील यामुळे बऱ्याच ठिकाणी नुकसान झाले आहे. या दोन्ही भागांमध्ये नेहमीच भूकंपाचे झटके बसत असतात. त्यामुळे नागरिक देखील या नैसर्गिक समस्येचा सामना जिगरीने करीत असतात. अजून किती नुकसान झाले आहे याची माहिती सध्या पुढे आलेली नाही मात्र पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये सध्या सामान्य नागरिक भूकंपामुळे घाबरलेले दिसून येत आहे. 
 
@@AUTHORINFO_V1@@