यामुळे अमेरिकेची विश्वासाहर्ता कमी होईल : बराक ओबामा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-May-2018
Total Views |



वॉशिंग्टन डी.सी. : अमेरिकेने इराणबरोबर केलेल्या अणु करारातून बाहेर पडण्याची चूक करू नये, अन्यथा यामुळे जगाचा अमेरिकेवर असलेला विश्वास पूर्णपणे नष्ट होईल, असा सल्ला अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी आज दिला आहे. ट्रम्प प्रशासनाने इराणबरोबर झालेल्या अणु करारामधून बाहेर पडण्यासंबंधी केलेल्या घोषणेच्या पार्श्वभूमीवर आज ते बोलत होते.

'अमेरिकेने अणु करारामधून बाहेर पडण्यासंबंधी घेतलेला निर्णय हा पूर्णपणे चुकाच असल्याचे ओबामा यांनी म्हटले आहे. अमेरिकेने केलेल्या अणु करारामुळे इराण आणि अमेरिका यांच्यातील दृढ झाले होते. परंतु आता जर अमेरिका या अणु करारामधून बाहेर पडली तर यामुळे अमेरिका आणि इराण यांचे संबंध तर बिघडतीलच परंतु यामुळे जगातील इतर देशांचा अमेरिकेवर असलेला विश्वास देखील पूर्णपणे नष्ट होईल. तसेच अमेरिकेच्या जागतिक प्रतिमेला देखील यामुळे मोठा धक्का बसेल, असे ओबामा यांनी म्हटले. त्यामुळे अमेरिकेने या करारामधून बाहेर पडू नये, असा सल्ला देखील त्यांनी दिला आहे.

बराक ओबामा यांच्या कार्यकाळामध्ये अमेरिकेने इराणबरोबर अणु करार केला होता. परंतु डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेची सूत्रे आपल्या हाती घेतल्यानंतर या करारातून अमेरिका बाहेर पडणार असल्याचे जाहीर केले होते. तसेच गेल्या महिन्याभरापासून अमेरिकेने यासंबंधी कारवाई देखील करण्यास सुरुवात केली आहे. यासाठी इराणने ट्रम्प यांना अनेक वेळा नाराजीचा इशारा देखील दिला आहे. परंतु ट्रम्प यांनी याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे.
@@AUTHORINFO_V1@@