सिलेंडर वाटप करणार्‍या वाहनात वजनकाटा ठेवा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-May-2018
Total Views |

ग्राहक संरक्षण परिषद सदस्यांची मागणी

 
जळगाव :
गॅसधारकांना गॅस सिलेंडरचे वजन करुन घेण्याची इच्छा असल्यास त्यांना वजन करुन घेता येण्यासाठी गॅस सिलेंडर घरपोच पुरविणार्‍या वाहनात वजनकाटा असावा. त्यामुळे गॅसधारकांना घेतलेल्या सिलेंडरच्या वजनाची खात्री करुन घेता येईल, अशी मागणी ग्राहक संरक्षण परिषदेच्या सदस्यांच्या बैठकीत केली. जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेची बैठक अपर जिल्हाधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्या अध्यक्षेखाली त्यांच्या दालनात सोमवारी झाली.
 
 
बैठकीला सदस्य सचिव तथा जिल्हा पुरवठा अधिकारी राहुल जाधव, शासकीय सदस्य तथा जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके, अशासकीय सदस्य ऍड.मंजुळा मुंदडा, विकास महाजन, सहित्यिक अ. फ. भालेराव, बाळकृष्ण वाणी, सतीश गडे, बापू महाजन, श्रीमती उज्ज्वला देशपांडे, विकास कोटेजा, सुरेश रोकडे, पुरवठा विभागाचे दांडगे यांच्यासह विविध शासकीय विभागांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
 
 
बैठकीत अशासकीय सदस्यांनी मागील बैठकांमध्ये मांडलेल्या विविध विषयांवरील २३ तक्रारींचा आढावा घेण्यात आला. यापैकी १८ तक्रारींचे निराकरण करण्यात आले आहे. उर्वरित तक्रारी सर्व संबंधित विभागाकडे कार्यवाहीसाठी पाठविण्यात आल्या आहेत. त्यावर कार्यवाही सुरु असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी राहूल जाधव यांनी दिली.
 
 
@@AUTHORINFO_V1@@