आदर्श आचारसंहितेची कडक अंमलबजावणी करा -- अभिमन्यु काळे

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-May-2018
Total Views |
 
 
 
 
 
मतदान केंद्र निश्चित करा
 
रोख व दारु वाहतुकीवर नियंत्रण ठेवा
 

भंडारा : भंडारा-गोंदिया लोकसभा पोट निवडणूकीसाठी अर्ज स्विकारण्याची अंतिम मुदत १० मे २०१८ असून उमेदवारी अर्ज दाखल झाल्या दिवसापासून उमेदवारांसाठी असलेल्या आदर्श आचार संहितेची कडक अंमलबजावणी करण्याचे निर्देश निवडणूक निर्णय अधिकारी अभिमन्यु काळे यांनी दिले. भंडारा व गोंदिया जिल्हयात रोख वाहतुक व दारु वाहतुकीवर कडक निर्बंध घालण्याच्या सूचना पोलीस प्रशासन व उत्पादन शुल्क विभागाला दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात निवडणूकीसंबंधी आढावा बैठक घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते.
 
 
दोन्ही जिल्हयात असलेल्या मतदान केंद्राचा आढावा घेवून केंद्र निश्चित करण्यात यावेत. यात संवेदनशिल, अतिसंवेदनशिल व व्हलरनेबल मतदान केंद्राची निश्चिती करण्यात यावी, अशा सूचना काळे यांनी दिल्या. प्रत्येक विधानसभा मतदार संघासाठी स्ट्रांग रुम तयार करण्यात यावी. स्टॅटिक्स सर्व्हेलन्स टिम व व्हिडिओ पथक नेमन्यात यावे. निवडणूकीच्या निमित्ताने अतिमहत्वाच्या व्यक्तींच्या सभा होत असतात. ही बाब लक्षात घेता सभेसाठी लागणाऱ्या परवानग्यासाठी एक खिडकी योजना राबवावी. सभेच्या परवानगीची एक प्रत जिल्हा निवडणूक शाखेकडे पाठवावी. 
 
 
सभेची परवानगी देतांना प्रथम येणाऱ्यास प्राधान्य हे धोरण राबवावे. अतिमहत्वांच्या व्यक्तींसाठी हेलीकॉपटरची परवानगी आवश्यक असल्यास त्या अनुषंगाने परवानगी दयावी, असे ते म्हणाले. त्याचप्रमाणे विनापरवानगी सभा व रॅली निघणार नाही याची दक्षता घेण्यात यावी. निवडणूक प्रचारासाठी अनेक पक्ष पॉम्पलेट व हँडबील प्रकाशित करतात त्यावर मुद्रक प्रकाशकाचे नाव असणे आवश्यक आहे, असे ते म्हणाले. 
@@AUTHORINFO_V1@@