मोदींच्या डोक्यात 'कॉंग्रेसमुक्त भारत'चे भूत : सोनिया गांधी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-May-2018
Total Views |

तब्बल दोन वर्षांनंतर घेतली जाहीर प्रचार सभा

 मोदी आणि भाजपवर हल्लाबोल




विजापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या डोक्यात सध्या कॉंग्रेसमुक्त भारताचे भूत शिरले असून त्यामुळे सध्या ते कसलीही उलटसुलट विधाने करत सुटले आहेत, असा टोला कॉंग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी आज पंतप्रधान मोदींनी लगावला आहे. तब्बल दोन वर्षानंतर घेण्यात आलेल्या आपल्या जाहीर प्रचारसभेमध्ये आज विजापूर येथे त्या बोलत होत्या.

गेल्या चार वर्षांमध्ये भाजपने निवडणुकांमध्ये दिलेले एक आश्वासन आजपर्यंत पूर्ण केलेले नाही. उलट कॉंग्रेस पक्षाने जनतेच्या भल्यासाठी सुरु केलेल्या अनेक योजना नष्ट करण्याचा घाट त्यांनी घातला आहे. अनेक ठिकाणी जाऊन मोदी फक्त खोटी भाषणे देत असतात, परंतु त्यांच्या भाषणाने सामन्य जनतेचे पोट भरणार नाही, असे सोनिया यांनी यावेळी म्हटले. तसेच मोदींच्या राज्यामध्ये शेतकरी, महिला, मध्यवर्गीय, अल्प्संखायक आणि दलित बांधव अनेक कष्ट सहन करत असून देशातील जनता पहिल्यांदाच इतकी कष्टी झाली आहे, असे देखील सोनिया यावेळी म्हणाल्या.

कुठे आहे लोकपाल ?

पंतप्रधान मोदींचे सर्वात आवडते आश्वासन म्हणजे भ्रष्टाचार मुक्त भारत. परंतु मोदी सरकारने गेल्या चार वर्षांच्या काळात भ्रष्टाचाराला आळा घालेले असे एकही कृत्य केलेले नाही. उलट त्यांच्या अत्यंत जवळच्या मित्राच्या मुलाने केलेले कृत्य सर्व देशाला माहित झालेले आहे. मोदींनी आपल्या कार्यकाळात लोकपाल लागू केलेला नाही, असे त्यांनी यावेळी म्हटले.


कॉंग्रेसला साथ द्या

आपल्या भाषणाच्या शेवटी देखील त्यांनी भाजप आणि मोदींवर टीका करत, कॉंग्रेसने कर्नाटकाला देशातील पहिल्या क्रमांकाचे राज्य बनवले असल्याचे त्यांनी म्हटले. तसेच भाजपच्या विद्वेषी राजकारणापासून कर्नाटकला वाचवण्यासाठी कॉंग्रेस पक्षाला येत्या निवडणुकीत भरभरून बहुमत देण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

@@AUTHORINFO_V1@@