जबाबदार वाहनचालक घडविण्यासाठी रस्ता सुरक्षा अभियान : कुलगुरू डॉ.पी.पी.पाटील

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-May-2018
Total Views |
  
 
 जळगाव :
जबाबदार वाहनचालक घडविण्यासाठी रस्ता सुरक्षा अभियान उपप्रादेशिक परिवहन विभाग व वाहतूक पोलिसांतर्फे राबविण्यात आल्याचे मत उमविचे कुलगुरु डॉ. पी.पी.पाटील यांनी व्यक्त केले. रस्ता सुरक्षा अभियान २०१८ च्या समारोप व पारितोषिक वितरणप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते वाहतूक पोलीस निर्मित दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले.
 
 
उपप्रादेशिक परिवहन व वाहतूक पोलीस जळगाव यांच्यातर्फे २३ एप्रिल ते ७ मे दरम्यान रस्ता सुरक्षा अभियान २०१८ उपक्रम राबविण्यात आला. कार्यक्रमाचा समारोप आणि बक्षीस वितरण सोमवारी, ७ रोजी सायंकाळी मंगलम सभागृहात करण्यात आला.यावेळी अपर पोलीस अधीक्षक बच्चनसिंह, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जयंत पाटील, उपपोलीस अधीक्षक रशिद तडवी, उ.पो.अ.सचिन सांगळे, स.प्रा.प.अधिकारी किरण मोरे, शहर वाहतूक शाखेचे सपोनि सागर शिंपी उपस्थित होते.
 
 
अभियानात चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा, वाहतूक शाखेने व्हिडिओ व्हॅनद्वारे वाहतुकीचे नियम व वाहन चालवितांना घ्यावयाची काळजी, आरोग्य शिबीर, पथनाट्य, रॅली, एफएमव्दारे प्रबोधन केल्याची व राबविलेल्या उपक्रमांची माहिती सपोनि सागर शिंपी यांनी प्रास्ताविकात दिली. वाहतुकीचे नियमभंग करणार्‍या १ हजार ७०० वाहनधारकांवर केसेस केल्या असल्याचे सांगितले. तसेच सायबर क्राईमच्या जनजागृती अंतर्गत ३२ महाविद्यालयातील ७ हजार विद्यार्थ्यांना माहिती दिली. रोटरीच्या १ हजार २०० सदस्यांना याकायद्याबाबत माहिती देण्यात आल्याचे स्पष्ट केले.याप्रसंगी ७ वी ते १० च्या मुलींच्या गटातुन प्रथम आलेल्या करुणा रंधे व मुलांच्या गटातील प्रथमेश पाटील यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देवून गौरविण्यात आले.
 
 
पंधरवाड्यात वाहनधारकांसह नागरिकांमध्ये प्रबोधन करण्यात आले. वर्षभरात जिल्ह्यात विविध अपघातात ४२२ जणांचा मृत्यू झाला आहे. ही संख्या २ ने घटली तरी हा उपक्रम यशस्वी झाला असे म्हणता येईल, असे आरटीओ जयंत पाटील यांनी सांगितले.
देशातील अपघातात १८ ते ४२ वयोगटातील वाहनधारकांची संख्या ६८.६ टक्के आहे. ५ ते १० वर्षापेक्षा कमी जुने असलेल्या वाहनांचा अपघात होण्याचे प्रमाण ७३ टक्के आहे. अतीगतीमुळे ६६ टक्के, ओव्हरटेक, मद्यप्राशन, मोबाईलवर बोलतांना आदींमुळेही अपघात होत असल्याचे मत अपर पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांनी व्यक्त केले.
 
वाहतूक पोलीस शाखेत उत्कृष्ट कार्य करणार्‍या कर्मचार्‍यांचा गौरव
मान्यवरांच्या हस्ते सहाय्यक फौजदार सतीश जोशी, राजेंद्र उगले, मुक्तार खॉं पठाण, पो.हे.कॉ. भरतसिंग पाटील, महिला पो.ना. सुनिता पाटील, पो.कॉ. किरण चौधरी, मिलिंद केदारे तसेच ट्राफिक वार्डन बॉईज यांचा गौरव करण्यात आला.
@@AUTHORINFO_V1@@