मोठ्या स्वंयसेवी संस्थांनी गावं दत्तक घेऊन लोकसंख्येएवढी झाडं लावावीत - सुधीर मुनगंटीवार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-May-2018
Total Views |
 
 
 
 
 
राज्यातील मोठ्या स्वंयसेवी संस्थांनी त्यांच्या आसपासची गावं दत्तक घेऊन तेथील लोकसंख्येएवढी झाडं लावावीत, ते संपूर्ण गाव हिरवेगार करावे असे आवाहन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. सह्याद्री अतिथीगृहात स्वंयसेवी संस्थांच्या प्रतिनिधीबरोबर झालेल्या बैठकीत ते बोलत होते. 
 
 
 
 
वन, वन्यजीव संरक्षण आणि संवर्धन आणि पर्यावरण रक्षणात दुसरी व्यक्ती काय काम करते यावर भाष्य करण्यापेक्षा आपण यात कशाप्रकारे योगदान देऊ शकतो याचा प्रत्येकाने विचार करण्याची गरज असल्याचे सांगून वनमंत्री म्हणाले की, सुरज ना बन पाये तो बनके दीपक जलता चल ही भावना प्रत्येकाने जपली पाहिजे. पर्यावरण रक्षणात वैयक्तिक आणि सामुहिक स्वरूपात लोक सहभागी होऊ शकतात. यासाठी विविध प्रकारचे व्यासपीठ शासनाने उपलब्ध करून दिले आहे. ग्रीन आर्मी, हॅलो फॉरेस्ट १९२६, महा फॉरेस्ट फेसबूक पेज, यु ट्युब चॅनल, इन्स्टाग्राम यासारख्या विविध समाज माध्यमांमध्ये वन विभाग सक्रिय असून या माध्यमांद्वारे ही सर्वांना वृक्ष लागवड आणि पर्यावरण रक्षणासाठी केलेले काम शासनाकडे नोंदवता येईल. वृक्ष लागवडीमध्ये माहिती तंत्रज्ञानाचा वापर केल्याने कोणता वृक्ष कुठे लावला हे ट्रॅक करणे शक्य झाले आहे. ही सर्व माहिती वन विभागाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली असून सर्व जनतेसाठी खुली आहे.
 
 
 
 
स्वंयसेवी संस्था वन विभागाशी त्रिपक्षीय करार करून वनसंवर्धनाच्या कामात सहकार्य करत आहेत. आणखी ज्या संस्थांना यात सहभागी होण्याची इच्छा आहे त्यांच्यासाठी राज्यभरात वृक्ष लागवडीसाठी उपलब्ध असलेल्या जागांची माहिती पुस्तिकेद्वारे उपलब्ध देण्यात आली आहे. ती पब्लिक डोमेन वरही उपलब्ध करून दिली जाईल. मेरा नाम पेड काटनेवाले हाथो मे नही तो पेड लगानेवाले हाथोंमे आना चाहिए, आग लगाने वाले नही तो आग बुझानेवाले हाथोंमे आना चाहिए असे प्रत्येकाला वाटले पाहिजे. असे झाल्यास पर्यावरण रक्षणाचा हा गोवर्धन उचलणे शक्य होईल, एक सुंदर पृथ्वी आपण आपल्या पुढच्या पिढीला देऊ शकू असेही ते म्हणाले.
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@