मुफ्ती घेणार सर्व पक्षीय बैठक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-May-2018
Total Views |

तामिळ युवकाच्या हत्येनंतर फुटीरतावाद्यांवर चर्चेसाठी बैठकीचे आयोजन 


श्रीनगर : फुटीरतावाद्यांच्या दगडफेकीत झालेल्या तामिळ मुलाच्या मृत्यूनंतर राज्याच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी तातडीने सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. राज्यातील सुरक्षेचा आढावा घेणे तसेच दगडफेकी करणाऱ्या युवकांच्या समस्येवर चर्चा हे दोन मुद्दे या बैठकीच्या केंद्रस्थानी असणार आहेत.

जम्मू-काश्मीरमधील बडगाम येथे फुटीरतावादी तरुणांकडून करण्यात आलेल्या दगडफेकीमध्ये काल एका २२ वर्षीय तामिळ तरुणाचा मृत्यू झाला होता. तामिळनाडूमधून हा तरुण आणि त्याचे मित्र हे जम्मू-काश्मीरमध्ये फिरण्यासाठी म्हणून आले होते. यावेळी बडगाममधील काही फुटीरतावाद्यांनी यांना लक्ष करून त्यांच्यावर दगडफेक करण्यात सुरुवात केली. यामध्ये संबंधित तरुणाचा मृत्यू झाला तर त्याच्यासह आलेले त्याचे मित्रही यामध्ये जखमी झाले. यामध्ये एका तरुणीचा देखील समावेश आहे. या घटनेनंतर देशभरातून यावर तीव्र प्रतिक्रिया येऊ लागली होती. मृत तरुणाचे कुटुंबीय देखील या घटनेची माहिती मिळाल्यानंतर श्रीनगर येथे पोहोचले. याठिकाणी मुख्यमंत्री मुफ्ती यांनी त्यांचे सांत्वन केले. तसेच दोषींवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते.

दरम्यान मुफ्ती यांनी ही बैठक बोलविल्यानंतर सोशल मिडीयावर सध्या एका वेगळ्याच चर्चेला सुरुवात झाली आहे. दगडफेक करणाऱ्या युवकांशी चर्चा करण्याऐवजी मुफ्ती यांनी त्यांच्यार कठोर कारवाई करावी, अशी मागणी काही लोकांकडून केली जात आहे. दगडफेक करणारे फुटीरतावादी लोक हे समजुतीची भाषा समजणार नाही, अशी प्रतिक्रिया अनेक जण देत आहेत. परंतु मुफ्ती यांनी मात्र या तरुणांशी चर्चा करण्याची भूमिका पुन्हा एकदा स्पष्ट केली आहे. त्यामुळे या बैठकीमध्ये मुफ्ती या फुटीरतावाद्यांविरोधात काय भूमिका घेतात ? हे पाहणी महत्त्वाचे ठरणार आहे.



@@AUTHORINFO_V1@@