आगामी आंतरराष्ट्रीय सामन्यांसाठी भारतीय संघ जाहीर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-May-2018
Total Views |

इंग्लंड, आयर्लंड आणि अफगाणिस्तानबरोबर होणार सामने



मुंबई : आगामी इंग्लंड, आयर्लंड आणि अफगाणिस्तान या संघांशी होणाऱ्या एकदिवशी, टी-२ आणि कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघांची आज घोषणा करण्यात आली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयचे सचिव अमिताभ चौधरी यांनी याविषयी अधिकृत घोषणा केली असून येत्या १४ तारखेपासून भारताच्या या आंतरराष्ट्रीय सामन्यांना सुरुवात होणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे.

यातील पहिला सामना अफगाणिस्तान संघासोबत होणार असून भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात एक कसोटी सामना खेळवला जाणार आहे. या एकमेव सामन्यासाठी भारतीय संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी अजिंक्य राहणेकडे देण्यात आली आहे. तसेच संघामध्ये शिखर धवन, मुरली विजय, के.एल.राहुल, चेतेश्वर पुजारा, करून नायर, वृद्धिमान साहा, आर.अश्विन, जडेजा, कुलदीप यादव, उमेश यादव,मोहम्मद शमी हार्दिक पंड्या आणि शार्दुल ठाकूर यांचा समावेश करण्यात आला असून इशांत शर्माला देखील या सामन्यासाठी भारतीय संघामध्ये करण्यात आला आहे.

यानंतरचा दुसरा सामना हा आयर्लंडसोबत होणार असून आयर्लंडबरोबर दोन टी-२० सामने होणार आहेत. यासामन्यांसाठी देखील भारतीय संघाची घोषणा करण्यात आली असून या सामन्यामध्ये विराट कोहली हा भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे. विराटच्या जोडीला शिखर धवन, रोहित शर्मा, के.एल.राहुल, मनीष पंड्या, महेंद्रसिंह धोनी, दिनेश कार्तिक, यजुवेन्द्र चहल, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर, भुवनेश्वर कुमार हार्दिक पंड्या, कौल आणि उमेश यादव यांची संघामध्ये नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच बऱ्याच काळानंतर भारताचा प्रसिद्ध फलंदाज सुरेश रैना याला देखील यंदा या सामन्यांमध्ये संधी देण्यात आलेली आहे.

दरम्यान यानंतर भारतीय संघ हा इंग्लंड दौऱ्यावर जाणार असून इंग्लंडबरोबर भारतीय संघाचे तीन टी-२० सामने आणि तीन एक दिवसीय सामने घेण्यात येणार आहेत. या सर्व सामन्यांमध्ये विराट कोहली हाच संघाचे नेतृत्व करणार आहे. यातील टी-२० सामन्यांसाठी आयर्लंडसाठी घोषित केलेला संघच कायम ठेवण्यात आला आहे. तसेच एक दिवसीय सामन्यांसाठी काही किरकोळ बदल करत सुरेश रैना आणि मनीष पंड्याच्या ऐवजी अनुक्रमे श्रेयस अय्यर आणि अंबाती रायडू या दोघांना संधी देण्यात आलेली आहे.



@@AUTHORINFO_V1@@