महाभियोग याचिकेचा राजकारणाशी कसलाही संबंध नाही : सिब्बल

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-May-2018
Total Views |


नवी दिल्ली : 'केंद्र सरकारकडून महाभियोग याचिकेचा संबंध वारंवारपणे राजकारणाशी जोडला जात आहे, परंतु या याचिकेचा राजकारणाशी कसलाही संबंध नसून ही याचिका पूर्णपणे न्यायव्यवस्थेतील घटनांशी जोडली गेलेली आहे' असे प्रतिपादन ज्येष्ठ कॉंग्रेस नेते कपिल सिब्बल यांनी केले आहे. सर्वोच्च न्यायालयातील महाभियोग याचिका मागे घेतल्यानंतर यासंबंधी चर्चेसाठी आयोजित केलेल्या कॉंग्रेसच्या पत्रकार परिषदेमध्ये ते आज बोलत होते.

'कोणत्याही राजकीय पक्षाने न्यायव्यवस्थेविषयी प्रश्न निर्माण केलेला नव्हता. उलट न्यायव्यवस्थेतीलच काही न्यायाधीशांनी समाजासमोर येऊन न्याय व्यवस्थेत सर्व ठीक नसल्याही प्रतिक्रिया दिली होती. यानंतर न्याय व्यवस्थेच्या कारभारामध्ये वारंवारपणे संशयास्पद घटना घडत गेल्या आणि सामान्य नागरिकांच्या मनामध्ये न्यायव्यवस्थेविषयी शंका निर्माण होऊ लागली होती. त्यामुळे न्यायव्यवस्था ही कायम नागरिकांच्या विश्वास पात्र राहिली पाहिजे, यासाठी म्हणून ही याचिका दाखल करण्यात आली होती' असे सिब्बल यांनी म्हटले.

तसेच कॉंग्रेसची ही याचिका पाच न्यायाधीशांसमोर का आणि कशी गेली ? हे दोन प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केले. न्यायपालिकेने कॉंग्रेसची याचिका पाच न्यायाधीशांसमोर नेण्याचे कारण आणि त्याच्या आदेशाची प्रत आम्हाला द्यावी, अशी मागणी त्यांनी केली. तसेच ही प्रत प्राप्त झाल्यानंतर प्रतमधील आदेशांविरोधात पुन्हा एकदा याचिका दाखल केली जाईल, असे त्यांनी म्हटले.

@@AUTHORINFO_V1@@