लोकशाही दिनाला २०८ अर्ज

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-May-2018
Total Views |

तक्रारींवर जिल्हाधिकार्‍यांचे तातडीने कार्यवाहीचे निर्देश

जळगाव :
येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी होणारा लोकशाही दिन सोमवारी जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला. लोकशाही दिनी जिल्हाभरातून आलेल्या नागरिकांच्या तक्रारी सर्व विभागांच्या जिल्हास्तरीय अधिकार्‍यांनी तक्रारदारांच्या जागेवर जावून जाणून घेतल्या. लोकशाही दिनी २०८ तक्रार अर्ज दाखल झाले. त्यात सहकार, जिल्हा परिषद, महसूल, कृषी, महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी, पोलीस यासह इतर विभागांच्या तक्रारींचा समावेश होता.
 
 
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजी दिवेकर, अपर जिल्हाधिकारी गोरक्ष गाडीलकर, निवासी उपजिल्हाधिकारी राहुल मुंडके, पोलीस उपअधीक्षक (मुख्यालय) रशीद तडवी, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी जयंत पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता प्रशांत सोनवणे, जिल्हा उपनिबंधक विशाल जाधवर, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी विवेक सोनवणे, समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त खुशाल गायकवाड, अग्रणी बँकेचे सहव्यवस्थापक भावसार, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक साहेबराव पाटील, नायब तहसीलदार विकास लाडवंजारी यांच्यासह विविध शासकीय विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकार्‍यांकडून तक्रारींचा आढावा
लोकशाही दिनाच्या कार्यक्रमानंतर जिल्हाधिकारी निंबाळकर यांनी लोकशाही दिनात प्राप्त झालेल्या तक्रारींचा आढावा घेतला. लोकशाही दिनी प्राप्त तक्रारी सर्व संबंधित विभागांकडे पाठविण्यात आल्यानंतर त्या तक्रार अर्जांवर संबंधित विभागाने पुढील कार्यवाही तातडीने करण्याचे निर्देश त्यांनी संबंधित विभागप्रमुखांना दिलेत.
 
थेट जनतेजवळ जावून जाणून घेतल्या तक्रारी
दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी होणार्‍या लोकशाही दिनाला जिल्ह्यातून असंख्य तक्रारदार जनता अनेकवेळा आवर्जून हजर होतात. अनेकवेळा त्यांच्या तक्रारींना संबंधित अधिकार्‍यांकडून दुर्लक्ष केले जाते. सोमवारी झालेल्या लोकशाही दिनाला जिल्ह्यातून ज्येष्ठ नागरिक हजर होते. आपल्या समस्यांची शासन दरबारी दखल घेतल्या जावी, या हेतूने तक्रारी घेवून आले होते. अशावेळी जिल्हाधिकार्‍यांनी व्यासपीठावर न थांबता थेट जनतेजवळ जावून तक्रारी जाणून घेतल्याचा प्रत्यय प्रत्यक्षदर्शींना आला.
@@AUTHORINFO_V1@@