होमियोपॅथीबद्दलचे समज - गैरसमज - भाग - ५

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-May-2018
Total Views |

होमियोपॅथी या औषधशास्त्राबद्दलच्या या लेखमालेत आपण काही दिवसांपासून होमियोपॅथीबद्दलचे गैरसमज दूर करत आहोत. आजच्या भागातही आपण होमियोपॅथीबद्दलच आणखी काही गोष्टी जाणून घेणार आहोत, ज्यामुळे लोकांचे गैरसमज आपोआपच दूर होतील व त्यांच्या शंकांचेही निरसन होईल. होमियोपॅथीची औैषधे ही संथ गतीने काम करतात व आजार बरा होण्यास वेळ लागतो, असा एक मोठा समज समाजात गेली अनेक वर्षं रुढ आहे. याबद्दल आपण या भागात माहिती घेऊया.

होमियोपॅथीची औषधे ही संथ काम करत नाहीत, किंबहुना इतर कुठल्याही औषधशास्त्राच्या औषधाप्रमाणेच ही औषधे त्वरीत त्यांचे काम सुरु करतात व रुग्णाला आराम देतात. शुद्ध होमियोपॅथीक उपचार घेणार्‍या हजारो-लाखो रुग्णांना याचा अनुभव आलेला आहे. Acute illness or disease किंवा ज्या आजारांना तातडीने उपचाराची गरज असते, अशा आजारांमध्ये होमियोपॅथी ही अतिशय गुणकारी व त्वरीत आराम देणारी म्हणून लोकमान्य आहे. अशा आजारांमध्ये उदा. मलेरिया, डेंग्यू, टायफॉईड, पोटाचे विकार, अस्थमा इत्यादी आजारांचा समावेश होतो. अशा आजारांमध्ये होमियोपॅथी ही अतिशय वेगाने व गुणकारी आहे. जर नीट विचार केला व लक्षपूर्वक बघितले तर कुठल्याही संसर्गावर प्रतिजैविके म्हणजे antibiotics दिली जातात. ही प्रतिजैविके-औषधे साधारणपणे पाच दिवस व बरेचदा तर त्याहूनही अधिक काळ घेतली जातात. म्हणजेच काय तर, ही औषधे पाच ते दहा दिवस घ्यावीच लागतात व तेव्हा कुठे रुग्ण बरा होतो. परंतु, या औषधांमुळे अशक्तपणा, चिडचिड, भूक न लागणे इत्यादी व यापेक्षाही वेगळे दुष्परिणाम होतात. होमियोपॅथीच्या औषधांचे रूग्ण चार ते पाच दिवसांत पूर्ण बरा होतो. परंतु, तरीही लोकांमध्ये असा गैरसमज आहे की, होमियोपॅथीची औषधे ही अशा इमर्जन्सी आजारांमध्ये उपयोगाची नाहीत. परंतु, मी अनुभवाने सांगू इच्छितो की, हे आणि इतर इमर्जन्सी आजार होमियोपॅथीच्या उपचाराने तातडीने बरे होतात. लोकांची मानसिकता जी आहे, ती बदलायला वेळ लागतो. मोठ्या मोठ्या गोळ्या, मोठ्या बाटल्यांमधील सिरप्स इंजेक्शनस यामुळे त्यांना असे वाटते की, आपण काही तरी उपचार घेत आहोत व अशावेळी हे रुग्ण पाच काय, दहा दिवसही विनातक्रार थांबतात. परंतु, होमियोपॅथीमध्ये आल्यावर मात्र एक दिवस नाही झाला, तर लगेच तक्रार करायला लागतात.

जे लोक म्हणतात की, होमियोपॅथी संथ काम करते, तेच लोक औषध घ्यायला आल्यावर मात्र उतावीळ होतात व त्यांना तात्काळ बरे व्हायचे असते. हे झाले तात्काळ उपचार गरजेचे असणार्‍या आजारांबाबत. पण, जुन्या आजारांवरही होमियोपॅथिक उपचार हे रामबाण असतात. बरेच जुने आजार घेऊन रुग्ण होमियोपॅथीकडे येतात. उदा.संधीवात, अस्थमा, मूत्रपिंडाचे विकार, मूतखडा, पित्ताशयातील खडे, मधुमेह, उच्च किंवा कमी रक्तदाब इत्यादी. या आजारांना बरे होण्यास किंवा नियंत्रणात आणण्यासाठी कुठल्याही औषधशास्त्राला ठराविक वेळ हा लागतोच. होमियोपॅथीमध्ये या सर्व आजारांवर अतिशय गुणकारक व खात्रीशीर उपाय सांगितलेले आहेत.


जर आपण इतर औषधशास्त्राची तुलना केली, तर त्या सर्व शास्त्रांमध्ये या अशा काही रोगांसाठी बराच कालावधीसाठी औषध घ्यावे लागते. याचा अर्थ असा नाही की, ही औषधे संथ काम करतात. होमियोपॅथीमध्येही तसेच आहे. या आजारांचे स्वरुपच असे असते की, त्यांना नियंत्रणात आणायला किंवा बरे करायला ठराविक कालावधी हा द्यावाच लागतो. म्हणजेच काय तर होमियोपॅथीही संथ काम करत नाही, तर आजारांचे स्वरुपच तसे असते.

पुढील भागांमध्ये आपण असेच काही शकांचे निरसन करणार आहोत.


- डाॅ. मंदार पाटकर
@@AUTHORINFO_V1@@