विकासाच्या प्रतिक्षेतला बिदर...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Total Views |



कर्नाटक राज्यात सर्वाधिक तापमानाची नोंद होत असलेल्या जिल्ह्याच्या रूपात बळ्ळारीकडे पाहिले जाते. निवडणुका जसजशा जवळ येत आहेत, तसतसे बळ्ळारीमधील निवडणुकीचे वातावरण अधिक तापत चालले आहे. बळ्ळारी जिल्ह्यात एकूण 8 मतदारसंघ आहेत. त्यापैकी राजकीयदृष्ट्या सर्वाधिक महत्त्वाचा मानला जाणारा मतदारसंघ म्हणजे बळ्ळारी शहर मतदारसंघ. या मतदारसंघावर खाण उत्खनन करणार्‍या उद्योगांच्या मालकांचे वर्चस्व आहे. यावेळी काँग्रेसने विद्यमान आमदार अनिल लाड यांना, तर भाजपने जी. सोमशेखर रेड्डी यांना उमेदवारी जाहीर केली आहे. जी. सोमशेखर रेड्डी हे भाजपचे नेते आणि माजी मंत्री जनार्दन रेड्डी यांचे बंधू आहेत. त्यातच रेड्डी हेदेखील माजी आमदार आणि माजी महापौर असल्याने ‘लाड विरूद्ध रेड्डी’ असा सामना रंगण्याची शक्यता आहे.

खेड्यांचे गाव म्हणजेच बिदर. बिदरमध्ये उत्तर दक्षिण असे दोन भाग पडतात. त्यातच दक्षिण भागात खेड्याची आणि लिंगायत समाजातील मतदारांची संख्या अधिक. महाराष्ट्रातल्या एखाद्या खेड्यातही निवडणुकीच्या वर्षभर आधीपासून निवडणुकीची लगबग सुरू झालेली दिसते. मात्र, कर्नाटकात तसे नाही. हळूहळू आता निवडणुका जशा जवळ येताहेत तसे हे वारे अधिक वेगाने वाहू लागले आहेत. त्यातच बिदरमधील महत्त्वाचा आणि भ्रष्टाचारामुळे अधिक चर्चेत आलेला मतदार संघ म्हणजे बिदर दक्षिण. सिंगापूरच्या धर्तीवर गावाचा कायापालट करायला निघालेल्या कर्नाटक मक्कळ पक्षाच्या विद्यमान आमदार अशोक खेणी यांना त्यांनीच दिलेल्या आश्वासनाचा विसर पडला. त्यामुळे ही निवडणूक म्हणजे खेणी यांच्यासाठी ‘आर या पार’ची निवडणूक ठरणार आहे.

महाराष्ट्राच्या लगतच बिदर जिल्हा आहे. बिदर जिल्ह्यातील चर्चेत राहिलेला मतदारसंघ म्हणजे दक्षिण बिदर. 1967 मध्ये या मतदारसंघाची निर्मिती झाली. या मतदार संघात लिंगायत समाजातील मतदारांची संख्या सर्वाधिक आहे. एकूण 1 लाख 98 हजार 725 मतदार असलेल्या या मतदार संघात लिंगायत समाजाचे 62 हजार, मुस्लीम समाजाचे 42 हजार, दलित समाजाचे 24 हजार, तर कुरूब म्हणजेच धनगर समाजाचे 18 हजार, रेड्डी 14 हजार, ख्रिश्चन 11 हजार, लमाणी, मागासवर्गीय आणि इतर बांधव मतदारांची संख्या अनुक्रमे 9 हजार आणि 15 हजारांच्या जवळपास आहे. 2013 साली पार पडलेल्या निवडणुकांमध्ये उद्योजक अशोक खेणी यांनी विजय मिळवला होता. मात्र आता नव्याने पार पडणार्‍या निवडणुकीत त्यांची वाट बिकट ठरण्याची शक्यता आहे. त्यांनी नुकताच आपला कर्नाटक मक्कळ पक्ष काँग्रेसमध्ये विलीन केला आणि काँग्रेसकडून उमेदवारीची माळ आपल्या गळ्यात पाडून घेतली. यातच खेणी यांना देण्यात आलेल्या या उमेदवारीमुळे बिदरमधील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि प्रदेशाध्यक्ष डॉ. परमेश्वरन यांच्याविरोधात कमालीची नाराजी पसरली आहे. यातच निजदचे बंडेप्पा काशेमपूर आणि भाजपने केजेपीमधून भाजपमध्ये आलेल्या डॉ. शैलेंद्र बेलदाळे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तसेच 2008 साली झालेल्या निवडणुकांमध्ये बंडेप्पा काशेमपूर यांना विजय मिळाला होता. आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे काशेमपूर आणि डॉ. बेलदाळे यांची मतदारसंघावर उत्तम पकड असल्यामुळे याठिकाणची निवडणूक चुरशीची होणार आहे. 2013 साली झालेल्या निवडणुकीतही निजद आणि भाजपच्या उमेदवारांनी खेणी यांना कडवी झुंज दिली होती. सध्या वारे खेणी यांच्या बाजूने वाहत असले तरी त्यांच्या मतदारसंघात विकासकामांची संख्या फारच कमी आहे. गावाचे सिंगापूरच्या धरतीवर कायापालट करण्याचे आश्वासनही हवेतच गायब झाल्याचे चित्र या ठिकाणी पहायला मिळत आहे. त्यातच त्यांच्या मालकीच्या नाईस या कंपनीने केलेल्या भ्रष्टाचारामुळे खेणी यांची प्रतिमा धुळीस मिळाली आहे. त्यातच ही येऊ घातलेली निवडणूक खेणी यांची परीक्षाच ठरणार आहे.

निजदनेही खेणी यांच्यासमोर तगडा उमेदवार देऊन आव्हान उभे केले आहे. बंडेप्पा काशेमपूर यांनीदेखील खेणी यांचा पराभव करण्यासाठी मतदारसंघात गेल्या सहा ते सात महिन्यांपासून मोर्चेबांधणी सुरू केली आहे. पूर्वीच म्हटल्याप्रमाणे या मतदारसंघात लिंगायत मतदारांची संख्या सर्वाधिक आहे. त्यातच खेणी आणि डॉ. बेलदाळे हे लिंगायत समाजातील असल्यामुळे लिंगायत समाजातील मते विभागली जाण्याची दाट शक्यता आहे. त्यातच याचा फायदा कुरुबा समाजातील काशेमपूर यांना होण्याची शक्यता आहे. त्यातच अशोक खेणी यांना उमेदवारी दिल्याने काँग्रेसच्या उमेदवारीचे प्रबळ दावेदार मानले जाणार्‍या चंद्र सिंग यांची निराशा झाली आहे. त्यामुळे याचाही फटका खेणी यांना बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अशातच दलित समाजातील लोकांची संख्याही या मतदारसंघात अधिक असल्याने ती मतेदेखील निर्णायक ठरणार आहेत. या विधानसभा निवडणुकीत बहुजन समाज पक्षाने माजी पंतप्रधान एच.डी.देवेगौडा यांच्या निधर्मी जनता दलाला पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे या मतदारसंघातील दलित समाजाची मतेही निजदला मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पंरतु नक्की कौल कोणाच्या बाजूने लागेल हे पाहण्यास थोडी वाट पहावी लागणार आहे.

बळ्ळारीत कोणाचा झेंडा ?


कर्नाटक राज्यातील सर्वाधिक तापमानाची नोंद होत असलेल्या जिल्ह्याच्या रूपात बळ्ळारीकडे पाहिले जाते. निवडणुका जसजशा जवळ येत आहेत, तसतसे बळ्ळारीमधील निवडणुकीचे वातावरण अधिक तापत चालले आहे. बळ्ळारी जिल्ह्यात एकूण 8 मतदारसंघ आहेत. त्यापैकी राजकीय दृष्ट्या सर्वाधिक महत्त्वाचा मानला जाणारा मतदारसंघ म्हणजे बळ्ळारी शहर मतदारसंघ. या मतदारसंघावर खाण उत्खनन करणार्‍या उद्योगांच्या मालकांचे वर्चस्व आहे. यावेळी काँग्रेसने विद्यमान आमदार अनिल लाड यांना तर भाजपने जी. सोमशेखर रेड्डी यांना उमेदवारी जाहीर केली आहे. जी. सोमशेखर रेड्डी हे भाजपचे नेते आणि माजी मंत्री जनार्दन रेड्डी यांचे बंधू आहेत. त्यातच रेड्डी हेदेखील माजी आमदार आणि माजी महापौर असल्याने लाड विरूद्ध रेड्डी असा सामना रंगण्याची शक्यता आहे.

रेड्डी यांचा या क्षेत्रावर पकड अधिक असल्यामुळे त्यांच्या विजयाची शक्यता अधिक आहे. यातच लाड हेदेखील परिचयाचे असले तरी राजकीय दृष्ट्या त्यांना कमी प्रमाणात प्रसिद्धी मिळत आहे. त्यामुळे या क्षेत्रावर भाजपच्या रेड्डी यांचीच बाजू वरचढ असल्याचे दिसून येत आहे. त्यातच बळ्ळारी महानगरपालिकेच्या महापौरपदी विराजमान असताना रेड्डी यांना मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळाली होती. त्यानंतर आमदार म्हणून निवडून आल्यावरही रेड्डी यांनी कर्नाटक दूध महामंडळाचे अध्यक्षपद भूषवले होते. मात्र, गेली निवडणूक त्यांनी लढवली नसल्याने लाड यांचा मार्ग सुकर झाला होता. मागील निवडणुकीत लाड यांनी भाजपच्या गुत्तीगानूर विरूपाक्ष गौडा यांचा 48 हजार 854 मतांनी पराभव केला होता. परंतु, यावेळी परिस्थिती आणि उमेदवार दोन्ही बदलले असून भाजपच्या रेड्डी यांचे पारडे लाड यांच्या पारड्यापेक्षा अधिक जड असल्याचे पाहायला मिळत आहे.



- जयदीप दाभोळकर
@@AUTHORINFO_V1@@