भारत आणि ग्वाटेमाला या दोन देशांमध्ये करार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-May-2018
Total Views |
 
 
 
 
 
गौतेमाला : भारत आणि ग्वाटेमाला या दोन देशांमध्ये काल एका करारावर स्वाक्षरी करण्यात आली आहे. उपराष्ट्रपती व्यंकैय्या नायडू हे सध्या ग्वाटेमाला देशाच्या दौऱ्यावर गेले आहे. तेथे त्यांनी काल ग्वाटेमालाचे राष्ट्रपती जिमी मोरालेस यांची भेट घेतली. या दोन नेत्यांच्या भेटीदरम्यान एका करारावर स्वाक्षरी करण्यात आली आहे. 
 
 
 
 
शिक्षणाद्वारे राजकीय मदत मजबूत करण्यासाठीचे करार या दोन देशांमध्ये करण्यात आले आहे. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये अनेक महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा देखील करण्यात आली. व्यंकैय्या नायडू हे पहिल्यांदाच ग्वाटेमाला या देशाच्या दौऱ्यावर गेले आहेत. भारत आणि ग्वाटेमाला या दोन्ही देशांमध्ये संबंध पहिल्यापासून चांगले आहे. मात्र हे संबंध अजून मजबूत करण्यासाठी हा दौरा करण्यात आला आहे असे व्यंकैय्या नायडू यांनी सांगितले आहे. 
 
 
 
 
 
यावेळी व्यंकैय्या नायडू यांनी प्रवासी भारतीयांना संबोधित केले आणि त्यांच्याशी संवाद देखील साधला. सौर उर्जा, उद्योग, महिला कल्याण, तंत्रज्ञान या सगळ्या क्षेत्रामध्ये ग्वाटेमाला हा देश भारताला चांगली मदत करू शकतो अशी माहिती यावेळी व्यंकैय्या नायडू यांनी दिली. यावेळी व्यंकैय्या नायडू यांनी ग्वाटेमालाचे उपराष्ट्रपती डॉ. जाफथ अर्नेस्टो कॅब्ररेरा फ्रँको यांची देखील भेट घेतली. 
 
 
 
 
 
ऑटोमोबाईल, औषध, कापड, माहिती आणि तंत्रज्ञान, इन्फ्रास्ट्रक्चर बिल्डिंग आणि पोर्ट डेव्हलपमेंट सेक्टर या क्षेत्रामध्ये ग्वाटेमाला भारताला खूप मदत करतो अशीही माहिती त्यांनी यावेळी दिली. 
@@AUTHORINFO_V1@@