२५ मे पासून राज्यात देखील 'ई-वे बिल' अनिवार्य

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-May-2018
Total Views |


मुंबई : वस्तू आणि सेवा कर अर्थात जीएसटीमध्ये नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या 'ई-वे बिल' पद्धत आता महाराष्ट्रात देखील लागू करण्यात येणार असून येत्या २५ मे पासून राज्यातील वाहतुकीसाठी ई-वे बिल अनिवार्य असणार असल्याची घोषण राज्याच्या वस्तू आणि सेवा कर विभागाकडून करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी यासंबंधीची नोंदणी तातडीने ऑनलाईन पद्धतीने करावी, अशी सुचना देखील जीएसटी विभागाकडून देण्यात आली आहे.

गेल्या १ एप्रिलपासून देशातील सर्व राज्यांमध्ये ई-वे बिल पद्धत टप्प्याटप्प्याने सुरु करण्यात येत आहे. राज्यात ही येत्या २५ मे सुरु करण्यात येणार असून त्यानंतर ५० हजार रुपयांवरील वस्तूंच्या राज्यांतर्गत होणाऱ्या वाहतुकीसाठी ई-वे बिल अनिवार्य असणार आहे. अन्यथा संबंधित वाहतूकदारावर आणि व्यावसायिकावर कायदेशीरपणे कारवाई करण्यात येणार असल्याचे विभागाने सांगितले आहे. तसेच राज्य कर आयुक्तांनी देखील याविषयीची अधिसूचना जारी केलेली आहे.


दरम्यान राज्यातील सर्व करदाते आणि वाहतुकदार यांनी येत्या २५ तारखेच्या आत https://www.ewaybillgst.gov.in/ या संकेतस्थळावर जाऊन आपली नावनोंदणी आवश्यक करावी, असे आवाहान देखील विभागाकडून करण्यात आले आहे.
@@AUTHORINFO_V1@@