नीट परीक्षेला ७५ विद्यार्थ्यांची दांडी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-May-2018
Total Views |
 

 
जळगाव :
वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी सीबीएसईतर्फे रविवारी शहरातील आठ केंद्रांवर ‘नीट’ परीक्षा झाली. शहरातील ८ केंद्रांवर ४ हजार ३८८ विद्यार्थ्यांनी परीक्षा देऊन ७५ विद्यार्थ्यांनी दांडी मारली होती. सकाळी ७ वाजेपासून परीक्षा केंद्रावर दाखल झाले होते. यावेळी परीक्षा केंद्रात प्रवेश करताना प्रत्येक विद्यार्थ्यांची मेटल डिटेक्टरने तपासणी करण्यात आली.
 
 
परीक्षेला येतांना ओळखपत्र व पासपोर्ट फोटो या व्यतिरिक्त इतर कोणत्याही वस्तु सोबत आणण्यास मनाई करण्यात आली होती़
परीक्षा केंद्रात प्रवेश करताच तपासणीनंतर विद्यार्थ्यांच्या बॅगा तसेच कमर पट्टा, बुट-मोजे, हातातील कडे तसेच मुलींच्या पर्स, कानातील रिंग हे बाहेर केंद्राच्या गेटवरच ठेवावे लागले़ परीक्षा केंद्रात पेन आणण्यास मनाई असल्यामुळे केंद्रातर्फे विद्यार्थ्यांना ते पुरविण्यात आले. केंद्राबाहेर पालकांनी गर्दी केली होती.
 
भौतिकशास्त्राच्या प्रश्‍नांनी फोडला घाम
सुचनांची भरमार आणि त्यानुसार झालेली प्रक्रिया विद्यार्थ्यांची परीक्षा पाहणारी ठरली़ विद्यार्थ्यांना सकाळी परीक्षा केंद्रात प्रवेश देण्यात आला़ यावेळी विद्याथी- विद्यार्थीनींच्या लांबलचक रांग लागलेली होती़ नंतर साडेनऊ वाजता वर्गात प्रवेश देण्यात आला़ १० वाजता पेरपरला सुरूवात झाली़ त्यानंतर स्वाक्षरी, ठसे प्रक्रिया पार पडल्यानंतर ७२० गुणांची प्रश्‍नपत्रिका विद्यार्थ्यांच्या हातात मिळाली़ प्रश्‍नपत्रिका पाहताच सुरूवातीला भौतिकशास्त्राच्या प्रश्‍नांनी विद्यार्थ्यांचा घाम फोडला़ रसायनशास्त्र व जीवशास्त्रचे प्रश्‍न सोपे असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले़.
 
 
@@AUTHORINFO_V1@@