डंपरने वृध्दाला उडविले

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-May-2018
Total Views |

वाळू वाहतुकीची समस्या संपता संपेना

जळगाव :
शहरातील चौबे शाळे चौकात सोमवारी वाळुवाहतुक करणार्‍या डंपरने वृध्दास धडक दिली. संतप्त नागरिकांनी डंपरवर दगडफेक केली.
 
 
रामदास भिवा भील हे ७० वर्षीय वृध्द हे सोमवारी सकाळी ९.४५ वाजेच्या सुमारास चौबे शाळा चौकातून पायी जात होते. यावेळी मागून भरधाव वेगात आलेल्या डंपरने त्यांना जोरदार धडक दिली. यात रामदास भील यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली. नागरिकांनी त्यांना तत्काळ उपचारार्थ जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. मात्र पोलिस आल्या नंतर पोलिसांना रामदास भील मिळून आले नाही.अपघात झाल्या नंतर झालेल्या दगडफेकीत डंपरच्या काचफुटल्या आहेत.
 
 
वर्षभरात वाळूच्या वाहतुकीने अनेक अपघात झाले यात बालका पासून तर वृध्दा पर्यंत जखमी झाले तर अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. अवैध वाळू वाहतुक थांबवावी म्हणून परवानाधारक वाळू वाहतुकदारंानी जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देवून लाक्षणिक आंदोलन सुध्दा केले आहे. परंतु कठोर कारवाई होत नसल्याने ही समस्या संपण्याचे कोणतेही चिन्ह दिसत नाही.
@@AUTHORINFO_V1@@