नाट्यकला जीवन जगणे, जगविण्याची कला

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-May-2018
Total Views |

बालनाट्य प्रशिक्षण शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी ज्येष्ठ रंगकर्मी वीरेंद्र पाटील यांचे प्रतिपादन

जळगाव :
नाट्यकला व्यक्तीच्या विकासाचे प्रमुख माध्यम आहे. नाट्यकला ही जीवन जगण्यासह जगविण्याची कला असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ रंगकर्मी वीरेंद्र पाटील यांनी केले.
 
 
जननायक थिएटर गृप भवरलाल आणि कांताबाई जैन फाउंडेशन तसेच रोटरी क्लब जळगाव वेस्टतर्फे जनचेतना जागर अभियान अंतर्गत ६ ते १३ मे या कालावधीत बालनाट्य प्रशिक्षण शिबिराचे आर.आर.शाळेजवळील अनुभूती इंग्लिश मीडियम स्कूल येथे आयोजन केले आहे. शिबिराचे उद्घाटन रविवारी, सकाळी११.३० वाजता ज्येष्ठ रंगकर्मी वीरेंद्र पाटील यांच्या हस्ते झाले. त्याप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ रंगकर्मी रमाकांत भालेराव, रोटरी वेस्टचे अध्यक्ष सुरज जहांगिर, ज्येष्ठ विधीज्ञ महेश भोकरीकर, अनुभूती स्कूलचे धारकर उपस्थित होते.
 
 
सोशल मीडिया, टेलिव्हिजन, मोबाईलच्या गर्तेत अडकलेली पालक व पाल्य एवढ्या मोठ्या प्रमाणात याठिकाणी सहभागी आहे. हे पाहिल्यावर चांगले कलावंत आणि रसिक या शिबिरातून नक्कीच निर्माण होतील, असा आशावाद ज्येष्ठ रंगकर्मी रमाकांत भालेराव यांनी व्यक्त केला. कला आणि कलावंतासाठी जेवढी मदत करता येईल. त्यासाठी रोटरी नेहमी तत्पर आहे आणि राहील, असे मत रोटरीचे अध्यक्ष सुरज जहांगिर यांनी व्यक्त केले. भवरलाल आणि कांताबाई जैन फाउंडेशन यांनी मोठेभाऊ यांचा वसा जपत उपक्रमास मदत केली असल्याचे ज्येष्ठ विधीज्ञ महेश भोकरीकर यांनी सांगितले.
 
 
यशस्वीतेसाठी कृष्णकांत वाणी, गनी मेमन, राहुल पवार, संदीप काबरा, साजीदभाई शेख, योेगेश भोळे, अनिल जोशी, फारुश शेख, कल्पेश झांबरे, सागर भंडगर, स्वप्निल गायकवाड, रवी गुजराथी, वासुदेव सोनार, पियुष तोतडकर, दीपाली हटकर, पुजा सुरळकर, नेहा गुरसाळे, नंदिनी चौधरी, भारती पाथरकर, गणेश सोनार, निवृत्ती इंगळे, स्वाती पाटील, देवता पाटील, राणी चव्हाण, नयना सनांसे, दीपाली वाणी, प्रशांत अपार, चेतन चौधरी, गणेश साळवे, निलेश वाणी, महेश बाविस्कर, अशोक बडगुजर, महेंद्र बाविस्कर आदी परिश्रम घेत आहेत.
 
 
शिबिरात होतील रोज ५ सत्र
शिबिरात नाट्य, नृत्य, संगीत, अभिनयाच्या माध्यमातून व्यक्तिमत्त्व विकास, वाचिक अभिनय, देहबोली, रंगमंचाची ओळख, कल्पनात्मक लिखाण आणि इतर विषयांबाबत राष्ट्रीय तसेच राज्यस्तरावर सन्मानित व उत्कृष्ठ कामगिरी कराणारे रंगकर्मी होनाजी चव्हाण, अमोल ठाकूर, हनुमान सुरवसे, दर्शन गुजराथी, नेहा पवार हे मार्गदर्शन करीत आहे.
@@AUTHORINFO_V1@@