भुसावळात युवकाचा चाकूने खून

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-May-2018
Total Views |

आरोपीच्या शोधार्थ पोलिस पथक रवाना

 
 
भुसावळ :
जुन्या वादातून पंचशिल नगर येथे आनंद अशोक वाघमारे वय २८ या युवकाचा चाकुने खून केला असल्याची घटना रविवारी रात्री उघडकिस आली. खुन करणारा आरोपीही सराईत गुन्हेगार असल्याचा पोलिसांचा संशय आहे.
 
 
जानेवारी मध्ये वाघमारे याच्या नातेवाईकासोबत संशयीत आरोपी प्रल्हाद सचदेवचा वाद झाला होता. रविवारी वाघमारे याने संशयीत आरोपी प्रल्हादला दुचाकीवर येऊन शिवीगाळ केली. त्यातून उभयतांमध्ये भांडण होवून वाद विकोपाला गेला. आरोपीने त्याच्याकडील धारदार शस्त्राने वाघमारेवर हल्ला चढवला.मयत वाघमारे याच्यावर चाकूसारख्या धारदार शस्त्राने पोटासह छातीवर वार केले. पाच ते सहा वार पोटासह छातीवर झाल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने वाघमारे यास शहरातील खासगी रुग्णालयात त्याला नेले असता वाघमारे यास मृत घोषित करण्यात आले.
 
 
आरोपीच्या शोधासाठी पथके रवाना
संशयीत आरोपी प्रल्हाद सचदेवच्या शोधासाठी जिल्हाभरात दोन पथके रवाना करण्यात आल्याची माहिती सहाय्यक पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी दिली.
@@AUTHORINFO_V1@@