कठुआ बलात्कार प्रकरण : पठाणकोट येथे खटला स्थानांतरीत

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-May-2018
Total Views |
 
 
 
 
 
 
 
जम्मू : संपूर्ण देशाला हादरवून सोडणाऱ्या कठुआ बलात्कार प्रकरणाच्या खटल्याला आता सर्वोच्च न्यायालयाने पठाणकोट येथे स्थानांतरीत केले असून आता या प्रकरणाची सुनावणी ९ जुलैला केली जाणार आहे. सुरक्षिततेचा विचार करता आज हे प्रकरण पठाणकोट येथे हलवण्यात आले आहे. जीव गेलेल्या मुलीच्या आईवडिलांनी हा खटला चंडीगड येथे स्थानांतरीत करण्यात यावा अशी मागणी न्यायालयाकडे केली होती. 
 
 
 
 
आता मात्र न्यायालयाने आईवडिलांना थोडासा दिलासा देत या प्रकरणाच्या खटल्याला पंजाबमधील पठाणकोट येथे स्थानांतरीत केले आहे. या प्रकरणामुळे जीव गेलेल्या मुलीच्या आईवडिलांना आणि हा खटला लढविणाऱ्या वकिलाला सारख्या जिवंत मारण्याच्या धमक्या मिळत होत्या. त्यामुळे त्यांच्या सुरक्षेचा विचार करता न्यायालयाने हे प्रकरण पठाणकोट येथे स्थानांतरीत केले आहे. 
 
 
 
काय आहे हे प्रकरण? 
 
 
गेल्या १० जानेवारीला जम्मू-काश्मीरमधील कठुआ जिल्ह्यातील रासना या गावातील एक बकरवाल मुस्लीम समुदायातील ८ वर्षीय असिफा आपल्या घरातून बेपत्ता झाली होती. खूप वेळ शोधाशोध केल्यानंतर देखील तिचा काही थांगपत्ता न लागल्यामुळे तिच्या कुटुंबीयांनी पोलिसांमध्ये याविषयी तक्रार केली. यानंतर पोलीस तपास करत असताना १७ जानेवारीला असिफाचा मृतदेह रासना गावाजवळील जंगलामध्ये पोलिसांना आढळून आला. यानंतर मृतदेहाची वैद्यकीय तपासणी केली असता असिफावर अनेक वेळा सामुहिक अत्याचार केल्याचे समोर आले. तसेच आठवडाभर तिला उपाशी ठेवून फक्त नशेच्या गोळ्या खाऊ घातल्याचे समोर आले. त्यानंतर तिची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली.
 
@@AUTHORINFO_V1@@