भुसावळात गावठी कट्टा बाळगणारा गोजर्‍या जेरबंद

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-May-2018
Total Views |
 
 
 
भुसावळ :
भुसावळ शहरात गावठी कट्टा घेवून दहशत माजविणार्‍याच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. शहरातील टि.व्ही टावर परिसरात रविवारी सायंकाळी कंबरेला गावठी कट्टा लावून फिरणारा किशोर उर्फ गोजोर्‍या सकरु जाधव रा. वाल्मीक नगर या २५ वर्षीय युवकाला बाजारपेठ पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्या जवळून १२ हजार रुपये किमतीचा गावठी कट्टा जप्त करण्यात आला आहे.
 
 
ही कावाई सहाय्यक पोलिस अधिक्षक निलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली अवैध शस्त्र जप्त पथकातील उपनिरीक्षक युवराज अहिरे, पो.ना.सुनिल सैंदाणे, सुनिल थोरात, कृष्णा देशमुख, निलेश बाविस्कर, दीपक जाधव यांनी केली.
@@AUTHORINFO_V1@@