मनमाड स्थानकावर उद्या पादचारी पुलाची दुरुस्ती

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-May-2018
Total Views |

रेल्वेच्या ४ गाड्या रद्द

 
भुसावळ :
मनमाड रेल्वे स्थानकावर मंगळवारी, ८ मे रोजी नवीन आणि जुन्या पादचारी पुलाच्या कामानिमित्त सकाळी ७.२५ ते दुपारी १२.१५ वाजेपर्यंत ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे ४ गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. काही गाड्यांच्या फलाटात बदल करण्यात आल्याची माहिती रेल्वेच्या सूत्रांनी दिली.
 
 
गाडी क्र. ५११५४ भुसावळ-मुंबई पॅसेंजर, ५१४२३/२४ इगतपुरी-मनमाड या गाड्या ८ रोजी रद्द केल्या आहेत. गाडी क्र. ५११५३ मुंबई-भुसावळ पॅसेंजर ही गाडी ९ रोजी रद्द केली आहे.
 
 
गाडी क्र. १२११८ मनमाड -लो.टि.टर्मि. ही गाडी फलाट क्र. ४ ऐवजी ५ वरुन धावेल. १२८८० भुवनेश्‍वर -लो.टि.ट, ११०९४ वाराणसी-मुंबई, १२१४२ पाटलीपुत्र- लो.टि.ट, ११०६० छपरा-लो.टि.ट व गाडी क्र. १५०६३ गोरखपूर-लो.टि.ट. या गाड्या ८ मे रोजी फलाट क्र. ३ ऐवजी फलाट क्र. ४ वरुन सुटतील.
 
 
गाडी क्र. १५०१७ एलटीटी- गोरखपूर (काशी एक्सप्रेस) ही गाडी समिट स्थानकात ११ वाजेला येईल आणि १२.१५ ला मनमाड रेल्वेस्थानकाकडे रवाना होणार आहे.
@@AUTHORINFO_V1@@