‘डंके की चोट’ पर मानधन काढले

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-May-2018
Total Views |

सैनिक कल्याण निधीला ४ लाख दिले

 
 
जळगाव :
मनपाच्या शनिवारी, ५ रोजी झालेल्या सभेत २७ नगरसेवकांना परस्पर मानधन देण्यात आल्याचा मुद्दा गाजला. त्यावर रविवारी, ६ रोजी नगरसेवक कैलास सोनवणे यांनी मानधन डंके की चोटपर काढले अन् सैनिक कल्याण निधीला दिल्याचे प्रसिध्दीपत्रकातून म्टटले आहे. 
 
 
सोनवणे दाम्पत्याने (कैलास सोनवणे आणि भारती कैलास सोनवणे) यांनी आपले नगरसेवक म्हणून मानधन जाहीर, उघडपणे घेतले आणि उरी सैनिक छावणीवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्‍वभूमीवर सैनिक कल्याण निधीला दिले होते. त्यांनी केलेल्या पवित्र राष्ट्रीय कार्याबद्दल काहींनी गुपचूप आणि परस्पर असा शब्दप्रयोग केल्याने त्यांच्या भावना दुखावल्याचा उल्लेख करुन पत्रकातून संताप व्यक्त केला आहे. २६ सप्टेंबर २०१६ रोजी पार पडलेल्या मनपाच्या सभेत उरी हल्ल्यातील शहीद जवानांना श्रध्दांजली वाहण्यात आली होती.
 
 
भर सभेत त्यांनी चार वर्षांचे त्यांचे मानधन जवानांना श्रध्दांजली म्हणून सैनिक कल्याण निधीला देण्याची घोषणा केली होती. तत्कालीन मनपा आयुक्तंानीही राष्ट्रीय कार्य म्हणून रकमेचा धनादेश तातडीने देण्याचे सभेतच सांगितले होते.
 
 
४ ऑक्टोबर २०१६ रोजी या रकमेचा धनादेश तत्कालीन जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांच्याकडे सुपूर्द केला होता. तेव्हा खान्देश विकास आघाडीसह सर्व पक्षांच्या इतर सर्वच सहकारी नगरसेवकांनी त्यांचे अभिनंदन केले होते. पुन्हा दुसर्‍यांदा जोवर नगरसेवक होतो. तोवरचे १० महिन्यांचे मानधनही त्यांनी सैनिक कल्याण निधीसाठी देणगी म्हणून जिल्हाधिकारी तथा महापालिका आयुक्त किशोर राजे निंबाळकर यांच्याकडे सुपूर्द केले आहे.
 
 
त्यात नगरसेवक म्हणून मिळालेले मानधन सैनिक कल्याण निधीला जाहीरपणे दिलेले आहे. पवित्र राष्ट्रीय कार्यासाठी गुपचूप आणि परस्पर मानधन काढल्याचे शब्द वापरले गेल्यामुळे दुखावल्याचे मतही कैलास सोनवणे यांनी प्रसिद्धपत्रकाद्वारे व्यक्त केले आहे.
 
 
मतलबी प्रवृत्तीचा भंडाफोड?...
कैलास सोनवणे यांच्या जाहीर केलेल्या प्रसिद्धीपत्रकामुळे अनेकांचे बुरखे टराटरा फाडल्याची चर्चा सर्वपक्षीय वर्तुळात आहे. मतदारांच्या हिताच्या मोठ्या गप्पा करायच्या. सामाजिक सेवेचा वसा घेतल्याची भाषा करायची. पण पैसा म्हटला की, तो खिशात आला पाहिजे. तो गरजूंना द्यायचा नाही... या प्रवृत्तीवर त्यांच्या भूमिकेमुळे प्रकाश पडला आहे. मनपा निवडणुकीत जर हा मुद्दा पुढे येवून गाजला तर अनेकांची बोलती बंद होण्याची शक्यताही राजकीय जाणकार व्यक्त करु लागले आहेत.
 
@@AUTHORINFO_V1@@