रमेश कराडांची निवडणुकीतून माघार ! भाजपचे धक्कातंत्र यशस्वी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-May-2018
Total Views |

 
लातूर-बीड-उस्मानाबाद मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार रमेश कराड यांनी ऐनवेळी विधानपरिषद निवडणुकीतून माघार घेऊन राजकीय वर्तुळात खळबळ माजवली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची खेळी त्यांच्यावरच उलटल्याची चर्चा सुरु आहे.
 
 
उमेदवार अर्जाची तारीख उलटून गेल्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला उमेदवार देता येणार नाही. भाजपचे सुरेश धस यांचे पारडे यामुळे जड झाल्याचे मानले जात आहे. रमेश कराड हे भाजपचे नेते होते. विधानसभा निवडणुकांच्या आधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात त्यांनी प्रवेश केला. एक कट्टर भाजप नेता तसेच गोपीनाथ मुंडे समर्थक भाजपमधून बाहेर पडल्यामुळे हा पंकजा मुंडे यांच्यासाठी मोठा धक्का मनाला जात होता.
 
 
मात्र ऐनवेळी उमेदवारी अर्ज मागे घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसची मोठी पंचाईत झाल्यामुळे भाजपचे धक्कातंत्र यशस्वी झाल्याचे बोलले जात आहे. त्याचबरोबर राष्ट्रवादीतून भाजपमध्ये प्रवेश केलेले सुरेश धस यांचे पारडे जड झाले आहे. दरम्यान धनंजय मुंडे यांनी त्यांच्या उमेदवारी अर्ज मागे घेण्याला काही अपरिहार्य कारण असल्याचे स्पष्ट केले. मात्र यात भाजपचे धक्कातंत्र यशस्वी झाल्याचे चर्चेत आहे.
 
 
@@AUTHORINFO_V1@@