रेल्वे व्यवसायीक होत आहे भुसावळ विभागाचे उद्योजक प्रदर्शनीत स्टॉल

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-May-2018
Total Views |
 
 
रेल्वे व्यवसायीक होत आहे
 
भुसावळ विभागाचे उद्योजक प्रदर्शनीत स्टॉल
भुसावळ, ७ मे
काळानुरुप बदल स्वीकारले तरच स्पर्धेत टिकता येते हा विश्‍वाचा नियम आहे. त्याअनुषंगाने रेल्वेने बदल स्वीकारत व्यवसायीकतेकडे पाऊल टाकले आहे.खाजगी उद्योजकांच्या प्रदर्शनीत मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाने स्टॉल लावून तसे संकेतच दिले आहे. देशात रेल्वेचे जाळे पसरलेले आहे. त्यामुळे महसूलही चांगला प्राप्त होत आहे. परंतु आधुनिकता जोपासली जात असल्याने खर्चही वाढला आहे. रेल्वेचा नफा वाढविण्यासाठी तसेच रेल्वेचा विकास करण्यासाठी प्रशासन आणि अधिकारी प्रयत्न करतांना दिसून येतात. त्यामुळे रेल्वे आता मार्केटींग मध्ये उतरली आहे. याचा प्रत्येय ३ मे रोजी मुंबई येथे निमा इंडेक्स याप्रदर्शनात दिसून आला.
 
 
या प्रदर्शनात रेल्वेचा स्टॉल लावण्यात आला. रेल्वेच्या इतिहासात प्रथमच असा स्टॉल लावण्यात आला.या स्टॉलव्दारे ग्राहकांना आकर्षीत करण्याचा प्रयत्न करण्यात आला. नागरिकांना रेल्वेच्या प्रवाशांसाठी सुविधा, मालाची ने-आण, रेल्वेचे उत्पादन याबाबत माहिती देण्यात आली.या प्रदर्शनात सहभागी होण्यासाठी खासगी आस्थापनांप्रमाणे रेल्वेच्या वाणिज्य अधिकार्‍यांना विशेष प्रयत्न करावे लागले.
 
 
नाशिक इंडस्ट्ीज ऍण्ड मॅन्युफॅक्चरर्ड असोसिएशन (नीमा)च्या वतीने ३ मे ते ५ मे दरम्यान मुंबईतील गोरेगाव येथील बॉम्बे एक्झिबिशन सेंटर येथे पहिल्यांदाच मेगा इंडस्टि्अल एक्सप्रो निमा इंडेक्स २०१८ चेआयोजन करण्यात आले. यात स्थानिक उद्योजकांना त्यांचे उत्पादन दाखविण्याासाठी व्यासपीठ उपलब्ध करुन देण्यात आले.
 
 
निमाच्या प्रदर्शनात १७ विविध विभागातील २५० स्टॉल लावण्यात आले.यात मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाने प्रथमच स्टॉल लावून जनतेला रेल्वेच्या विविध सुविधांची माहिती करुन दिली.यासाठी भुसावळ विभागाचे वाणिज्य व्यवस्थापक सुनील मिश्रा यांनी स्टॉलची मंजुरी मिळवून आणली.स्टॅालवर भुसावळचे अधिकारी चापोळकर, प्रविण जंजाळे, कुंदन महापात्रा, जीवन चौधरी यांनी नागरिकांना रेल्वे बाबत माहिती दिली. रेल्वेच्या या प्रयोगामुळे रेल्वे कात टाकून व्यवसायीक होत असल्याचे दिसून येते.रेल्वेने महसूल वाढीवर लक्षकेंद्रीत केले असल्याचे दिसून येते.
वाहतुक क्षेत्रात दिवसेंदिवस बदल होत आहेत.रेल्वेच्या वाहतुकीस खासगी वाहतुकदारांचे आव्हान असतेच. तसेच दर्जेदार सुविधा देण्यात स्पर्धा दिसून येत आहे. यावर रेल्वे प्रशासनाने उपाय शोधला असून पब्लीक,प्रायव्हेट , पार्टनरशीपव्दारे रेल्वे स्थानक विकसीत करण्याचा प्रयत्न केला जात आहे. रेल्वेच्या सुविधांची नागरिकांना माहिती व्हावी यासाठी जाहिरात सोबतच उद्योजक प्रदर्शनीच्या माध्यमातुन जनतेपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न आधुनिकतेची कास धरत असून मार्केटींगमधील पाऊल ठरत आहे. यात मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाने हा प्रयोग करुन धक्काच दिला आहे.
 
@@AUTHORINFO_V1@@