जिल्ह्यात पोलिसांचा धाक संपलाय...?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-May-2018
Total Views |
 
जळगाव :
जळगाव जिल्हा आणि गुन्हेगारी हे समीकरणच बनत चालले आहे. पोलीस चोरी, लुटमाराचा तपास करण्यात यशस्वी होत आहेत. परंतु गोळीबारच्या घटनांवर अंकुश लावण्यात पोलीस अपयशी ठरले आहे का? असा प्रश्‍न अमळनेर येथे ४ रोजी मध्यरात्रीच्या सुमारास झालेल्या गोळीबाराच्या घटनेवरुन उपस्थित होऊ लागला आहे.
 
 
जिल्ह्यात पिस्तुल आणि काडतुस सापडणे नवीन नाही. मागील तीन वर्षांत जिल्ह्यात गोळीबार करण्याच्या घटना घडल्या आहेत. यात भुसावळ तालुका अव्वलस्थानी आहे. न्यायालयाच्या प्रवेशद्वारासमोर, बसमध्ये, वेश्यावस्तीत गोळीबार अशा घटनांमध्ये ज्यांच्यावर हल्ला झाला त्यांचा जीव गेला. तसेच गेल्यावर्षी सोमाणी गार्डनमध्ये गोळीबार झाला. सुदैवाने यात ज्यांना गोळी लागली त्यांचा जीव वाचविण्यात डॉक्टरांना यश आले. भुसावळ शहरात दोन डझनपेक्षा अधिक घटना या गावठी कट्टे आणि काडतूस पकडले जाण्याच्या झाल्या असल्याचा अंदाज आहे.
 
 
पिस्तुल आणि काडतुस येतात तरी कुठून?
स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेनेही जिल्ह्यात अनेक ठिकाणी सापळा रचून गावठीकट्टे आणि काडतूस जप्त केले आहे.पोलीस गुन्ह्यांचा उकल करतात ही कौतुकास्पद बाब आहे. परंतु जिल्ह्यात पिस्तुल आणि काडतुस येतात तरी कुठून आणि कसे? हा अनुत्तरित प्रश्‍न आहे. पोलीस अद्याप त्याच्या मुळापर्यंत पोहचू शकले नाहीत.
 
 
चोरी, दरोडे, लुटमार, चैनस्नॅचिंगच्या घटनांमध्ये काही प्रमाणात घट झाली. तसेच गुन्हे उघडकीस येण्याचे प्रमाण वाढले आहे.
पण जिल्ह्यात पिस्तूल आणि काडतुसच्या घटना पाहतात जिल्ह्याची वाटचाल मोठ्या गुन्हेगारीकडे होत आहे का? असा प्रश्न जनसामान्यांमधून उपस्थित होत आहे. छोट्यामोठ्या गुन्ह्यातील आरोपी लवकर पकडले जात आहेत. परंतु पिस्तुलांच्या मुळापर्यंत पोहचताच येत नाही हे जिल्ह्यातील पोलीस यंत्रणेचे अपयश म्हणावे लागणार आहे.
@@AUTHORINFO_V1@@