काळवीट शिकार प्रकरण : सलमानवर १७ जुलैला होणार पुढील सुनावणी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-May-2018
Total Views |
 
 
 
 
 
जोधपुर : काळवीट शिकार प्रकरणी अडकलेला प्रसिद्ध अभिनेता सलमान खान आज या प्रकरणाच्या सुनावणीसाठी जोधपुर न्यायालयात उपस्थित झाला होता. आज या प्रकरणावर सुनावणी करण्यात आली असून आता या प्रकरणावर १७ जुलैला सुनावणी करण्यात येणार आहे. सलमान खान याला सध्या जामिनावर सोडण्यात आले आहे. त्यामुळे आता यावर पुढील सुनावणी १७ जुलैला करण्यात येणार आहे.
 
 
 
१९९८ साली हम साथ साथ है चित्रपटाच्या शुटींगच्या वेळी मध्यरात्री केलेल्या काळविट शिकार प्रकरणात सलमान खान दोषी आढळला. जोधपुर न्यायालयाने त्याला ५ वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. त्यानंतर सलमानला त्वरित कारागृहात हलविण्यात आले. तब्बल २० वर्षांनंतर या प्रकरणाचा निकाल लागला असून आता या निकालावर सलमान खान याने जामीन अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे आता न्यायालय या जामीन अर्जावर काय निर्णय घेते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
 
 
 
 
तसेच न्यायालयाने सलमानला २५ मे ते १० जुलै २०१८ या कालावधीत परदेशात जाण्याची परवानगी देखील दिली आहे. या कालावधीत सलमान कॅनडा, नेपाळ आणि अमेरिका या तीन देशांमध्ये जावू शकतो. चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी सलमान खान याला परदेश दौरे करावे लागतात. त्यामुळे त्याला आता परदेश दौरे देखील करता येणार आहेत. 
 
@@AUTHORINFO_V1@@