कार्बन फूटप्रिंट कमी करण्यामध्ये कंपन्यांनी योगदान द्यावे - सुधीर मुनगंटीवार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-May-2018
Total Views |
 
 
 
 
 
मुंबई : हरित सेनेचे सदस्य होऊन वृक्ष लागवड कार्यक्रमात राज्यातील कंपन्या आणि उद्योजकांनी सहभागी व्हावे व कार्बन फुटप्रिंट कमी करण्यात योगदान द्यावे असे आवाहन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार केले. सह्याद्री अतिथीगृहात सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली १३ कोटी वृक्ष लागवडीची माहिती देण्यासाठी तसेच त्यात सहभागी होण्याचे आवाहन करण्यासाठी कॉर्पोरेट हाऊसेसची बैठक आयोजित करण्यात आली होती त्यावेळी ते बोलत होते.
 
 
राज्यातील इंडस्ट्री “ग्रीन इंडस्ट्री” व्हावी अशी अपेक्षा व्यक्त करून वनमंत्री म्हणाले की, राज्यातील औद्योगिक वसाहतींमध्ये मोठ्याप्रमाणात जागा मोकळी आहे. येथे वृक्षलागवड करून मोकळ्या जागेच्या ३३ टक्के वृक्षाच्छादनाचा निकष कंपन्या पूर्णत्वाला नेऊ शकतात, तो विचार कंपन्यांनी करावा, वृक्षलागवडीत कंपन्यांच्या मालकांनी स्वत:सह कामगारांना सहभागी करून घ्यावे, त्यांना हरित सेनेचे सदस्य करावे. यात कंपन्यांचा स्वार्थ असला पाहिजे. कारण जिथे वृक्ष अधिक तिथे वातावरण अधिक चांगले राहाते. त्याचा परिणाम कामगारांच्या कार्यक्षमता वृद्धीवर होऊन उत्पादन वाढण्यात होतो असेही ते म्हणाले.
 
 
मागील तीन वर्षात मिळालेल्या व्यापक लोकसहभागाने वृक्ष लागवडीचे मिशन लोकांपर्यंत पोहोचले असल्याचे सांगून सुधीर मुनगंटीवार म्हणाले की. जिथे वृक्ष आहे तिथे पाणी आहे त्यामुळे राज्यातील वृक्ष्राच्छादन वाढले तर पाणी वाढेल यातून शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न सुटू शकतील हे लक्षात घेऊन उद्योजक आणि व्यावसायिकांनी आपले सामाजिक योगदान ना केवळ वृक्ष लावण्यामध्ये परंतू सीएसआर अर्थात सामाजिक दायित्व निधीच्या माध्यामतूनही निभवावे. कंपन्यांनी त्यांच्या आसपासची काही गावे दत्तक घेऊन तिथे कामगारांच्या आणि गावकऱ्यांच्या सहकार्याने वृक्ष लागवड करावी, शेतकऱ्यांच्या बांधावर, शेतात सामाजिक वनीकरण शाखेची मदत घेऊन महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत ॲग्रो फॉरेस्ट ही संकल्पना राबवावी, यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होण्यास मदत होईल.
@@AUTHORINFO_V1@@